'सुख म्हणजे नक्की काय असतं' शिर्के-पाटलांच्या घरात सत्तापालट, शालिनीवर आली गौरीचे पाय पुसण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:38 IST2022-07-07T15:30:59+5:302022-07-07T15:38:39+5:30
गेल्या कित्येक दिवसांपासून शिर्केपाटील कुटुंबात अनेक उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळात होतं. आता मालिकेत शालिनीवर गौरीचे पाय पुसरण्याची वेळी आली आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' शिर्के-पाटलांच्या घरात सत्तापालट, शालिनीवर आली गौरीचे पाय पुसण्याची वेळ
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata). गेल्या कित्येक दिवसांपासून शिर्केपाटील कुटुंबात अनेक उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळात होतं. एकाच वेळी दोन जयदीप समोर उभे राहिल्यामुळे या मालिकेला एक वेगळं वळण मिळालं होतं. यामध्येच आता मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. शिर्केपाटील कुटुंबात आतापर्यंत सून म्हणून राहणारी गौरी या घराची लेक असल्याचं सत्य समोर आलं आहे. माई शालिनीला गौरीचे पाय धुवायला लावतायेत.
एकेकाळी शिर्केपाटील कुटुंबात मोलकरीण म्हणून काम करणारी गौरी जयदीपसोबत लग्न करुन या घराची सून होते. आता मात्र गौरी या घराची सून नसून घरची लेक असल्याचं सत्य समोर आलं आहे. यानंतर माई गौरीला तिची लेक म्हणून स्वीकारते आणि मोठ्या थाटात आपल्या लेकीचं स्वागत करते. इतकंच नाही तर ती यापुढे शिर्केपाटील कुटुंबाची मालकीण असेल असं घोषित करते.
सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये माई शालिनीला गौरीचं पाय धुवून स्वागत करायला सांगतात. माईंच्या हातात पाण्याचा तांब्या बघून शालिनी तिला पाणी पाजायचं आहे असं विचारते. यावर माई नणंदेचा पाय धुवायतचे आहेत असं सांगतात. हे ऐकून शालिनीला धक्काच बसतो. ऐवढंच नाही तर तिचं साडीच्या पदराने पाय पुसायला सांगतात. शालिनीचा राग अनावर होतो. आता चिडलेली शालिनी गौरी विरुद्ध काय नवा डाव रचणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेत नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.