'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये नवीन ट्विस्ट, आता होणार या पात्राची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 17:52 IST2019-12-12T17:51:41+5:302019-12-12T17:52:10+5:30
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये नवीन ट्विस्ट, आता होणार या पात्राची एन्ट्री
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दयाबेन एन्ट्री कधी करणार याची वाट चाहते पाहत आहेत. त्यात आता मालिकेत नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मालिकेत दयाबेन नाही पण तिच्या आईची एन्ट्री होऊ शकते. दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून मालिकेत दिसत नाही आहे.
आगामी भागात दाखविले जाणार आहे की, जेठालालचे वडील चंपक लाल बऱ्याच कालावधीपासून मिसिंग आहेत. वडीलांचा शोध घेता घेता जेठालाल थकून गेला आहे. तो स्वतःला लाचार समजू लागला आहे.चंपक लाला जवळ त्याचा चश्मा नाही त्यामुळे जेठालाल जास्त चिंतेत आहे. तर चश्मा शिवाय चंपक लालला दिसत नाही आहे. जेव्हा तो मदत मागतो तेव्हा तो संकटात सापडतो.
यादरम्यान चंपकलालची एक व्यक्ती मदत करतो. त्याला गोकुळधाम सोसायटी माहित असते. मात्र त्या व्यक्तीला कमी ऐकू येत असते. तो चुकून चंपक लालला ठाण्याच्या गोकुलधाम सोसायटीच्या बसमध्ये बसवून देतो. त्याच वेळी जेठालाल व सोसायटीतील लोक चंपकलालची मिसिंग रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. यादरम्यान जेठालाल सासूला फोन करतो आणि वडीलांना शोधण्यासाठी मदत मागतो. दयाबेनची आई आपला जावई जेठालालची मदत करते.
आता पाहावे लागेल की निर्माते दयाबेनच्या आईचा चेहरा दाखवतात की नेहमीप्रमाणे यावेळी बॅकग्राउंडला तिचा आवाज ऐकायला मिळणार आहे, हे लवकरच समजेल.