'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 11:27 IST2020-07-22T11:27:18+5:302020-07-22T11:27:49+5:30

रात्रीस खेळ चाले 2मध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे.

New twist in 'Ratris Khel Chale 2', Anna and Shevanta will get married | 'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न

'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिनेइंडस्ट्रीतील शूटिंगचे काम थांबले होते. मात्र आता अनलॉकनंतर पुन्हा नव्या नियमावलीसह मालिका व चित्रपटांच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकही मालिकांचे नवे एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले 2मध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे. मालिकेत शेवंता आणि अण्णा नाईक यांचे लग्न लागणार आहे.


लग्नाआधी या मालिकेतील शेवंताचा हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  अण्णा आणि शेवंताचं लग्न होणार असले तरी या मालिकेतील कथानकाला नवीन वळण प्राप्त होण्याची शक्यता आहे.

शेवंतासोबत लग्न करणे हे अण्णा नाईक यांचे नवीन कारस्थानही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी भाग पाहिल्यानंतरच खरे चित्र समोर येईल.


'रात्रीस खेळ चाले २' मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली आहे.

अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. तर अण्णा नाईकांची व्यक्तीरेखा अभिनेते माधव अभ्यंकर साकारत आहेत.

Web Title: New twist in 'Ratris Khel Chale 2', Anna and Shevanta will get married