‘ललित २०५’मध्ये नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:48 IST2018-11-19T16:41:41+5:302018-11-19T16:48:13+5:30

‘ललित २०५’ या मालिकेत नाट्यमय वळण येऊ घातलंय. नील आणि भैरवीमधलं नातं खुलत असतानाच आता मालिकेत ऋषभ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

New Twist in Neel-Bhairavi's 'Lalit 205' | ‘ललित २०५’मध्ये नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट

‘ललित २०५’मध्ये नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट

ठळक मुद्देदिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण ऋषभची भूमिका साकारणार आहे

‘स्टार प्रवाह’वरील ‘ललित २०५’ या मालिकेत नाट्यमय वळण येऊ घातलंय. नील आणि भैरवीमधलं नातं खुलत असतानाच आता मालिकेत ऋषभ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचा नेमका उद्देश काय आहे हे लवकरच उलगडेल पण ऋषभच्या येण्याने नील आणि भैरवीच्या नात्यात नवं वादळ येणार हे मात्र नक्की. नील-भैरवीचं तीन महिन्यांचं लग्नाचं कॉण्ट्रॅक्टही आता संपत आलंय. पण मनाने मात्र हे दोघंही जवळ येत आहेत. नीलच्या कठीण काळात भैरवी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ही गोष्ट नीलच्या मनात खोलवर रुजलीय. याचमुळे भैरवीबद्दल त्याच्या मनात प्रचंड आपुलकी आणि प्रेम निर्माण होत आहे. हे प्रेम व्यक्त करण्याचा नील प्रयत्न करत असतानाच आता ऋषभच्या येण्याने सर्व गोष्टी बदलणार आहेत.

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण ऋषभची भूमिका साकारणार आहे. याआधी ‘रुंजी’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत तो दिसला होता.

ऋषभच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना वरद म्हणाला, ‘ऋषभ हा मानसोपचार तज्ञ आहे. या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत. त्यामुळे काम करताना खूप मजा येतेय. शिवाय ‘ललित २०५’ ची टीम प्रचंड उत्साही आहे. सुहास जोशींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं जे या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये काम करताना नेहमी आपलेपणा वाटतो, म्हणूनच ऋषभचं पात्र रंगवताना मला प्रचंड आनंद होतोय.’

Web Title: New Twist in Neel-Bhairavi's 'Lalit 205'

टॅग्स :Lalit 205ललित 205