'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, अखेर दीपा-कार्तिकचं चौकोनी कुटुंब होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 10:54 IST2022-04-25T10:53:59+5:302022-04-25T10:54:18+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट, अखेर दीपा-कार्तिकचं चौकोनी कुटुंब होणार पूर्ण
मराठी टेलिव्हिजनवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीमध्ये रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे. नुकताच या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अखेर दीपा आणि कार्तिक एकत्र येणार असून त्यांचे चौकोनी कुटुंब पूर्ण होणार आहे.
रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यात शाळेच्या शिक्षिका सांगतात की, शाळेत नाटक सादर करणार आहोत आणि यात मोठांच्या भूमिकादेखील आहेत. त्या भूमिका मुलींच्या पालकांनी कराव्यात अशी शाळेची इच्छा आहे. त्यावर दीपिका म्हणाली डॅडा हो म्हण ना. त्यानंतर दीपा म्हणते मॅडम मला सुद्धा...पण लगेच कार्तिकी बोलते आई तू नाही म्हणू नको. त्यावर दीपा आडेवेडे घेते. पण दीपिका म्हणते की, तुम्ही जर काम केले नाही तर आम्हीदेखील काम करणार नाही. त्यामुळे शाळेच्या नाटकामध्ये कार्तिक दीपा कार्तिकी आणि दीपिकाच्या आई वडिलांची भूमिका साकारताना दिसतील. नाटकाच्या निमित्ताने हे चौकोनी कुटुंब एकत्र येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मालिकेत पाहायला मिळाले की, सौंदर्या इनामदारांची मोठी कंपनी आहे, ज्यात ब्युटी प्रॉडक्ट बनवले जातात. नवीन संकल्पना घेऊन इनामदारांची कंपनी नवीन प्रॉडक्ट लाँच करणार आहे आणि यासाठी त्यांना नवा फेस हवा आहे. या जाहिरातीसाठी त्यांनी दीपाची निवड केली. या जाहिरातीच्या शूटिंगसाठी दीपा एक सुंदर साडी नेसून तयार होते. दीपासोबत या जाहिरातीत कार्तिकची मुलगी दीपिका देखील झळकते आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पहिल्यासारखंच तयार झालेल्या दीपाला पाहून कार्तिक घायाळ होताना दिसतो.