चंद्र आहे साक्षीलामध्ये संग्रामला कळले श्रीधरच्या खोटेपणाविषयी, पण स्वाती अडकली संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:36 IST2021-04-09T17:35:04+5:302021-04-09T17:36:32+5:30
श्रीधरचे बिंग लवकरच फुटणार असले तरी स्वाती एका संकटात अडकणार आहे.

चंद्र आहे साक्षीलामध्ये संग्रामला कळले श्रीधरच्या खोटेपणाविषयी, पण स्वाती अडकली संकटात
चंद्र आहे साक्षीला ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपणार याची घोषणा झाल्यापासून या मालिकेत आता पुढे काय होणार असा प्रश्न मालिकेच्या फॅन्सना पडला आहे. श्रीधरचे बिंग कधी फुटणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. पण आता श्रीधरचे बिंग लवकरच फुटणार असले तरी स्वाती एका संकटात अडकणार आहे.
श्रीधर काळे ही व्यक्ती कोण आहे याचा तपास गेल्या काही दिवसांपासून संग्राम करत आहे. श्रीधर रंगा बनून संग्रामकडेच काम करत असून त्याने त्याचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यालाच संग्रामने श्रीधर काळेविषयी माहिती काढायला सांगितली आहे. पण रंगाने त्याला श्रीधर विषयी सगळी चुकीची माहिती दिली आहे. आता संग्रामला रंगा आणि श्रीधर एकच असल्याचे कळणार आहे.
घरातील सगळ्या महिला शॉपिंगसाठी बाहेर गेल्या असताना संग्रामला श्रीधरविषयी खरे कळणार असून तो त्याच्या स्टाईलमध्ये श्रीधरला झापणार आहे. पण या सगळ्यात माझी काहीही चुकी नाही, मी स्वातीच्या सांगण्यावरून सगळे केले अशी खोटी थाप श्रीधर मारणार आहे. मी एकट्याने नव्हे तर मी आणि स्वाती मिळून तुझी फसवणूक केली असे संग्रामला तो सांगणार आहे. त्यामुळे आता संग्राम पेचात पडणार आहे.
श्रीधरने सगळे स्वातीवर टाकल्याने आता ती संकटात अडकली आहे. या सगळ्यात ती तिची बाजू कशाप्रकारे मांडणार, संग्रामला तिने सांगितलेले पटणार का हे पुढील काही दिवसांतच कळेल.
या कार्यक्रमात ऋतुजा बागवे, अस्ताद काळे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.