‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये नवा ट्विस्ट; सोहमला लगाम घालण्यासाठी येतेय ‘जुनी’ शुभ्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:11 IST2021-06-02T18:11:07+5:302021-06-02T18:11:59+5:30
‘अग्गंबाई सूनबाई’ची शुभ्रा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर आता शुभ्राचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये नवा ट्विस्ट; सोहमला लगाम घालण्यासाठी येतेय ‘जुनी’ शुभ्रा
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या दुस-या सीजनाला म्हणजेच ‘अग्गंबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकेला ही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेयं. सध्या या मालिकेतील प्रत्येक पात्राची सोशल मीडियावर कमालीची चर्चा पाहायला मिळते. आता काय तर ‘अग्गंबाई सूनबाई’ची शुभ्रा (Shubhra) जाम चर्चेत आहे. कारण काय तर आता शुभ्राचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होय, अगदी बबड्याला तोडीस तोड असे तिचे नवे रूप प्रेक्षकांना दिसणार आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ची शुभ्रा जरा खमकी होती. अगदी सोहमला (Soham) पुरून उरेल इतकी खमकी. पण ‘अग्गंबाई सूनबाई’ मधील शुभ्रा मात्र त्या तुलनेत अगदीच सौम्य दिसली. बबडूची आई असलेली आणि फक्त घर सांभाळणारी ही शुभ्रा इतकी भोळी आहे की, सोहम तिच्या या भोळेपणाचा फायदा घेतोय. आताश: शुभ्रालाही हे लक्षात आलेय.
आपल्या साधेपणाचा नवरा फायदा घेतोय. सांगूनही सुझेनशी असलेले त्याचे अफेअर थांबत नाहीये, हे शुभ्राने वेळीच ओळखले. त्यामुळेच आता सोहमला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी ती सज्ज झाली आहे.
सुझेनशी असलेले सगळे सबंध तोडून टाक, असे ती सोहमला बजावते. पण सोहम तिला उलट उद्धटपणे बोलतो. यानंतर शुभ्राचा नवा अवतार पाहून खुद्द सोहमही दचकतो.
काही दिवसांपूर्वी शुभ्राने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे मात्र सुझेन शुभ्राची जागा घ्यायचा प्रयत्न करतेय. अशा शुभ्रा तिला कशी मात देणार, सोहमला कशी वठणीवर आणणार? हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. शुभ्राच्या नव्या रुपाने मालिकेत नक्की काय वळण येतेय, ते लवकर बघूच.