रसिकांच्या भेटीला नव्या मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 13:10 IST2016-09-15T07:40:45+5:302016-09-15T13:10:45+5:30
छोट्या पडद्यावर लवकरच काही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येतायत.वर्षअखेरीस विविध नव्या मालिकांचा समावेश आहे. 'नामकरण' या मालिकेपाठोपाठ 'चंद्र नंदिनी', ...

रसिकांच्या भेटीला नव्या मालिका
छ ट्या पडद्यावर लवकरच काही नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येतायत.वर्षअखेरीस विविध नव्या मालिकांचा समावेश आहे. 'नामकरण' या मालिकेपाठोपाठ 'चंद्र नंदिनी', 'परदेस में हैं मेरा दिल', 'मीनू मौसी' आणि 'मास्टर शेफ' या मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहेत. ही यादी इथंच संपणार नसून आणखी मालिका रसिकांच्या मनोरंजनासाठी दाखल होतेय. या मालिकेतील नायिका नास्तिक आहे. दैवी शक्ती यावर तिचा विश्वास नाही. ही भूमिका नवोदित टीना नावाची अभिनेत्री साकारणार आहे. तर या मालिकेतील नायकाच्या भूमिकेसाठी कुबूल हैं फेम सुभाशिष झा याची वर्णी लागलीय. नायिकेच्या एकदम विरुद्ध पात्र सुभाशिष साकारणार असून त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा मात्र देवावर पूर्ण विश्वास आहे. आता या मालिकेचे नायक आणि नायिका एकमेंकांशी कसे जुळवून घेतात याचं उत्तर या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना मिळणार आहे. याशिवाय या मालिकेत अभिनेत्री मानसी साळवी आणि अभिनेता विवेक मुश्रण यांचीही वर्णी लागली असून ते सुभाशिषच्या आई वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळतील.