'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 18:45 IST2018-10-11T18:44:51+5:302018-10-11T18:45:43+5:30

'आम्ही दोघी'मध्ये मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्यावर आधारीत आहे.

new person entry in Amhi Doghi Serial | 'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री

'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री

ठळक मुद्दे'आम्ही दोघी' मालिकेत शरद पोंक्षेची एन्ट्री

झी युवा वाहिनीवरील मालिका 'आम्ही दोघी'चे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी नवीन मधुरा पाहिली. शिवानी रांगोळे जी मधुराची भूमिका साकारत होती तिला काही कारणास्तव ही मालिका सोडावी लागली आणि तिच्या जागी प्रसिद्धी किशोर ही मधुराची भूमिका निभावतेय. पण प्रसिद्धीशिवाय मालिकेत अजून एक नवीन एन्ट्री प्रेक्षकांनी पाहिली. 

सध्या चालू असलेल्या ट्रॅक नुसार मालिकेत मधुराला मीरा आणि आदित्यच्या नात्याबद्दल कळते आणि जिद्दी मधुरा आत्महत्येचे नाटक करते, जेणेकरुन मीरा तिला वाचवण्यासाठी आदित्य पासून दूर जाण्याचे वचन देईल आणि तसेच घडते. आदित्यला या घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही. दुसरीकडे मीरा मधुराला दिलेल्या वचनामुळे घर सोडायचा निर्णय घेते. मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मीराची भेट कामत नावाच्या एका इसमाशी होते आणि योगायोगाने तो माणूस मीराला ओळखतो. या व्यक्तीची भूमिका अभिनेता शरद पोंक्षे निभावत आहे. कामत यांचे मीराला भेटण्याचे आणि तिला मदत करण्याचं उद्दिष्ट नक्की काय असेल? मीरा वाटेतून दूर झाल्यामुळे आता मधुरा आदित्यला जिंकू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहायला विसरू नका.

Web Title: new person entry in Amhi Doghi Serial