कपिलच्या कुटुंबातील नवा सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 12:46 IST2016-07-05T07:16:17+5:302016-07-05T12:46:17+5:30
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात प्रेक्षकांना आता एक नवा कलाकार पाहायला मिळणार आहे. दिया और बाती हम या ...

कपिलच्या कुटुंबातील नवा सदस्य
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात प्रेक्षकांना आता एक नवा कलाकार पाहायला मिळणार आहे. दिया और बाती हम या मालिकेत मिनाक्षीची भूमिका साकारणारी कनिका महेश्वरी कपिलच्या कार्यक्रमात झळकणार आहे. कनिका कपिलच्या कार्यक्रमाचा भाग होणार असल्याने कनिका दिया और बाती हम ही मालिका सोडणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. पण कनिकासाठी दिया और बाती ही मालिका खूप स्पेशल असल्याने तिने ही मालिका न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिया और बाती हम आणि द कपिल शर्मा शो अशा दोन्ही कार्यक्रमामध्ये कनिका काम करणार असल्याचे ती सांगते.