मदिराक्षीचे नवे रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:08 IST2016-06-30T10:38:32+5:302016-06-30T16:08:32+5:30
सिया के राम या मालिकेत काहीच दिवसांत प्रेक्षकांना राम आणि रावणातील युद्ध पाहायला मिळणार आहे. सध्या रावणाने सीतेचे अपहरण ...
मदिराक्षीचे नवे रूप
स या के राम या मालिकेत काहीच दिवसांत प्रेक्षकांना राम आणि रावणातील युद्ध पाहायला मिळणार आहे. सध्या रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतेच एक दृश्य चित्रीत केले गेले, त्यात रावणाचा वध करण्यासाठी सीता कालीमातेचे रूप घेते असे दाखवण्यात आले होते. खरे तर हा ड्रीम सीक्वेन्स होता. हे दृश्य चित्रीत करणे मदिराक्षीसाठी खूप कठीण असल्याचे ती सांगते. कारण यात तिला जीभ शक्य तितकी बाहेर काढून डोळे वटारायचे होते हे सगळे करणे खूपच आव्हानात्मक असल्याचे ती सांगते. या दृश्यासाठी मदिराक्षीची वेशभूषाही खूपच वेगळी करण्यात आली होती.