"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:31 IST2024-05-07T16:29:30+5:302024-05-07T16:31:42+5:30

T 20 वर्ल्डपकसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंंच झाली. ती पाहून लोकांना तारक मेहता.. मधल्या जेठालालची हटकून आठवण आली

netizens reactions after seeing Team India t20 worldcup jersey virat kohli and compare tarak mehta jethalal | "कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सध्या ipl 2024 ची चांगलीच चर्चा आहे. आयपीएल संपल्यावर सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे T 20 वर्ल्डकपची. अशातच नुकतीच टीम इंडियाची नवीन जर्सी लॉंच झालीय. ही जर्सी पाहून लोकांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील जेठालालची आठवण आली. विराट कोहली, रोहित शर्माचे नवीन जर्सीतले फोटो व्हायरल होताच लोकांना जेठालाल आठवलाय. असं काय झालं?

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. ज्यामध्ये केशरी आणि निळा रंग असलेली जर्सी दिसली. अशीच जर्सी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या पूर्वीच्या भागामध्ये कलाकारांनी परिधान केलेली. 'तारक मेहता..' मध्ये जी गोकुलधाम प्रिमियर लीग झालेली जी GPL नावाने ओळखली जाते, त्यात जेठालाल आणि त्याच्या टीमने ही जर्सी परिधान केली होती.

त्यामुळे T 20 वर्ल्डकपची जर्सी पाहताच लोकांना 'तारक मेहता..' ची जर्सी आठवलीय. याशिवाय कोहली आणि टीमची जेठालालसोबत मजेशीर तुलना केलीय. १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काहीच दिवसांपुर्वी केली गेली. १५ प्रमुख खेळाडू आणि ४ राखीव खेळाडू अशा एकूण १९ खेळाडूंच्या नावाची घोषणा BCCI ने केली. ५ जूनला भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे.

Web Title: netizens reactions after seeing Team India t20 worldcup jersey virat kohli and compare tarak mehta jethalal