n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">24च्या दुसऱ्या सिझनमध्येही नील भूपालम पंतप्रधान आदित्य सिंघानीयाची भूमिका साकारणार आहे. पंतप्रधानांच्या भूमिकेत असल्यामुळे नीलला खूपच चांगले हिंदी बोलता येणे गरजेचे होते. पण नीलचे हिंदी तितकेसे चांगले नाहीये. त्यामुळे त्याने खास या मालिकेसाठी हिंदी भाषेचे धडे गिरवले आहेत. त्याने हिंदी शिकवण्यासाठी हैदर अली यांची नेमणूक केली होती. अनेकवेळा त्याला हिंदी शिकवणारे हैदर अली यांना तो मालिकेच्या सेटवरही घेऊन येत असे. कोणताही संवाद म्हणताना मी चुकीचा उच्चार करणार नाही याची मी काळजी घेतली असे नील सांगतो. तसेच या मालिकेतील व्यक्तिरेखा ही नीलच्या खऱ्या आयुष्यातील वयापेक्षा मोठी असल्यामुळे त्याला लूकवरही खूप मेहनत घ्यायला लागली असल्याचे तो सांगतो.