n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नेहा पेंडसे मे आय कमिन मॅडम या मालिकेत एका वेगळ्य रूपाता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ती व्हिक्टोरियाकालीन वेशभूषेत झळकणार आहे. नेहाला व्हिक्टोरियाकालीन वेशभूषा खूप आवडते. त्यामुळे मालिकेत ही वेशभूषा करायची आहे हे तिला कळले, त्यावेळी ती खूपच खूश झाली. तिने स्वतः नेटवर व्हिक्टोरियाकालीन कपडे कशाप्रकारे असतात हे शोधून काढले आणि त्यातून तिच्या कॉस्च्युमची निवड केली. व्हिक्टोरीयाकालीन वेशभूषा, त्या काळातील भव्यता, शालीनता मला खूपच आवडते. त्यामुळे मी कोणाचीही मदत न घेता स्वतः ही वेशभूषा निवडली. प्रेक्षकांना माझी ही नवीन वेशभूषा आवडेल अशी मला खात्री आहे असे नेहा सांगते.