आदित्य नारायणच्या शोमध्ये चाइल्ड कंटेस्टंट म्हणून आला होता नेहा कक्करचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत, पाहा व्हिडीओ

By गीतांजली | Updated: October 16, 2020 19:42 IST2020-10-16T19:20:19+5:302020-10-16T19:42:28+5:30

सध्या नेहा व रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत.

Neha kakkar's boyfriend rohanpreet participated as a child contestant in aditya narayan's show | आदित्य नारायणच्या शोमध्ये चाइल्ड कंटेस्टंट म्हणून आला होता नेहा कक्करचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत, पाहा व्हिडीओ

आदित्य नारायणच्या शोमध्ये चाइल्ड कंटेस्टंट म्हणून आला होता नेहा कक्करचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत, पाहा व्हिडीओ

नेहा कक्कर नाव सध्या रोहनप्रीत सिंग सोबत जोडले जाते आहे. दोघांनी एकत्र एक गाणंसुद्धा गायले आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात चाइल्ड कंटेस्टंट म्हणून  रोहनप्रीत सिंग सारेगममापा लिटिल चँपमध्ये भाग घेताना दिसतोय. विशेष म्हणजे या शोचे सूत्रसंचालन आदित्य नारायणने केले होते. 


लहान मुलांच्या सिंगिंग शोमध्ये घेतला होता भाग 
रोहनप्रीत सिंगने अनेक वर्षांपूर्वी चाइल्ड कंटेस्टंट म्हणून  सारेगममापा लिटिल चँपमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी शोचा जज सोनू निगम होता आणि विशेष अतिथी म्हणून एपिसोडमध्ये काजोल आणि अजय देवगणने आले होते. इंडस्ट्रीतील अशा दिग्गज दिग्गजांसमोर रोहनप्रीत सिंगने 'कुछ कुछ होता है' चित्रपटातील 'लडकी बड़ी अंजनी है' हे गाणे गायले होते आणि ते त्याचे खूप कौतूक झाले होते. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.

आदित्य नारायण होतो सूत्रसंचालक
खास गोष्ट अशी की, ज्या शोमध्ये रोहनप्रीत चाइल्ड कंटेस्टंट म्हणून आला असताना आदित्य नारायण यांनी शोचे आयोजन केले होते. दोघांच्या वयात किती अंतर आहे याचा अंदाज आपण यावरुन लावू शकतो. सध्या नेहा व रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. येत्या 21 ऑक्टोबरला नेहा आणि रोहनप्रीत लग्न करणार असे मानले जातेय. पण तूर्तास हे लग्न खरोखर होणार की हा सुद्धा प्रमोशनचा एक फंडा आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याआधीही ‘इंडियल आयडल’च्या सेटवर नेहा व आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या अशाच चर्चा रंगल्या होत्या. पण तो सुद्धा एक प्रमोशन फंडा होता.

नवे कपडे शिवायला देऊ की लाईक-शेअर करू...? नेहा कक्करने विशाल ददलानीला केले कन्फ्युज

 

Web Title: Neha kakkar's boyfriend rohanpreet participated as a child contestant in aditya narayan's show