हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 16:14 IST2020-11-18T16:08:48+5:302020-11-18T16:14:00+5:30

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या हनीमूनसाठी दुबईला गेली आहे.

Neha kakkar to resume shooting of indian idol 2020 after return from dubai honeymoon | हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम

हनीमूनवरुन पतरल्यावर नववधू नेहा कक्कर येणार मुंबईत आणि करणार 'हे' काम

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या हनीमूनला दुबईला गेली आहे. रोहनप्रीत आणि नेहा त्यांच्या लक्झरी हनीमूनचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करतायेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतायेत. हमीमूनवरुन परतल्यानंतर नेहा रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल 2020च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.  रोहनप्रीत आणि नेहा या दोघांनीही दुबईत दिवाळीचे जबरदस्त सेलिब्रेशन केले आहे.

टेलिव्हिजनचा लोकप्रिय  रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडलचा नवा सीझन लवकरच सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे. शोमधील ऑडिशनची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण झाली आहे. नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. रोहनप्रीत सिंगसोबत लग्नानंतर नेहा पुन्हा शोच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दुबईमधून हनीमूनवरुन परतल्यानंतर नेहा मुंबईला येणार आहे.

इंडियन आयडल सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो 29 नोव्हेंबरपासून टीव्हीवर दिसणार आहे. ज्याची शूटिंग लवकरच सुरु करण्यात येणार आहे,  सोनी टीव्हीद्वारे या शोचे अनेक प्रोमोदेखील समोर आले आहेत, ज्यात काही कन्फर्म कंटेस्टंटची ओळख करुन देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अंजली आणि आशिष, राजस्थानमधील सवाई, उत्तराखंडमधील शानमुख प्रिया आणि पवनदीप आणि आंध्र प्रदेशातील सिरीशा यांचा समावेश आहे.

Web Title: Neha kakkar to resume shooting of indian idol 2020 after return from dubai honeymoon