'इंडियन आयडॉल'च्या मंचावर नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीनं 'दिलबर' गाणं केलं सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:02 IST2021-04-10T17:01:44+5:302021-04-10T17:02:15+5:30

गायिका ध्वनी भानुशालीने नुकतेच छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली होती.

Neha Kakkar and Dhwani Bhanushali performed 'Dilbar' on the stage of 'Indian Idol' | 'इंडियन आयडॉल'च्या मंचावर नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीनं 'दिलबर' गाणं केलं सादर

'इंडियन आयडॉल'च्या मंचावर नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीनं 'दिलबर' गाणं केलं सादर

गायिका ध्वनी भानुशालीचे नुकतेच राधा हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला. या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी ध्वनी छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या हजेरी लावली होती. यावेळी या शोची परीक्षक नेहा कक्करने ध्वनीसोबत ब्लॉकबस्टर गाणे दिलबरवर परफॉर्म केले.

इंटरेस्टिंग बाब ही आहे की नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशाली यांनी गायलेले दिलबर हे पहिले भारतीय गाणे आहे. जे टी सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर १ बिलियन लोकांनी पाहिला आहे. जेव्हा या दोघींची भेट झाली आणि या गाण्याच्या सक्सेसवर चर्चा झाली. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी दिलबर गाण्याचे लाइव्ह सादर करायचा निर्णय घेतला आणि इंडियन आयडॉलच्या मंचावर धुमाकूळ घातला.


नेहा आणि ध्वनीचा लाइव्ह परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक, स्पर्धक आणि परिक्षक थक्क झाले. नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीने अनपेक्षित लाइव्ह परफॉर्मन्स देऊन सर्वांना सरप्राइज द्यायचा निर्णय घेतला. दोन्ही गायिकेंना एकमेकांप्रती खूप सन्मान आहे. त्यामुळे त्या दोघींना एकत्रित लाइव्ह परफॉर्म करताना पाहणे ट्रिटपेक्षा कमी नाही.


नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीचा लाइव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी इंडियन आयडॉलच्या या आठवड्याचा भाग सोनी टीव्हीवर नक्की पहा.

Web Title: Neha Kakkar and Dhwani Bhanushali performed 'Dilbar' on the stage of 'Indian Idol'