"गेली दोन वर्ष खूप दमछाक...", 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट, चाहत्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:51 IST2026-03-12T13:50:51+5:302026-03-12T13:51:26+5:30
'येड लागलं प्रेमाचं' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र आता मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.

"गेली दोन वर्ष खूप दमछाक...", 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट, चाहत्यांना धक्का
'येड लागलं प्रेमाचं' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील राया आणि मंजिरीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेतील इतर कलाकारांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. मात्र आता मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत जीजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी मालिका सोडली आहे. जीजीचा मालिकेतील प्रवास संपल्यामुळे नीना कुळकर्णींना 'येड लागलं प्रेमाचं'मधून एक्झिट घ्यावी लागली आहे.
नीना कुळकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात, "जीजी गेली. मनाला चटका लावून... येड लागले प्रेमाचे ह्या स्टार प्रवाह वरच्या मालिकेमधले माझे काम संपले. गेली २ वर्ष मालिकेचे अविरत चित्रीकरण केले. जीजीचा दरारा मोठा... त्यामुळे तिचे सीन्सही तसेच...मोठे आणि जिवंत. दमछाक व्हायची, पण सर्वांनी सांभाळून घेतले. अगदी सहकलाकारांपासून ते क्रिएटिव्हस, दिग्दर्शन, प्रोडक्शन, कॅमेरा टीम्स, मेकअपची मंडळी , हेयर ड्रेसर... स्पॉट बॉईज आणि त्यांचे सुग्रास पदार्थ! सगळेच मनमिळाऊ आणि हसतमुख. ह्या सेटवर ना कधी वाद झाले ना कधी मतभेद. आम्ही सगळे सामोपचाराने काम करायचो. असा अनुभव विरळाच. येड लागले प्रेमाचेच्या पुढच्या प्रवासाकरता माझ्या शुभेच्छा. कितीतरी सुरेख आठवणींचा ठेवा बरोबर घेऊन निघाले आहे".
नीना कुळकर्णींचा मालिकेतला प्रवास संपल्यानंतर त्यांना टीमकडून खास सरप्राइज देण्यात आलं. खास केक कापून सेलिब्रेशन केलं गेलं. त्यांना साडी भेट म्हणून देण्यात आली. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि विशाल निकम मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत आता किशोरी शहाणेंची एन्ट्री झाली आहे.