नीलचे पहिले प्रेम परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 14:03 IST2016-07-14T08:33:51+5:302016-07-14T14:03:51+5:30
जमाई राजा या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे, तुम ऐसे ही रहना, सुमीत संभाल लेगा या ...

नीलचे पहिले प्रेम परतणार
ज ाई राजा या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे, तुम ऐसे ही रहना, सुमीत संभाल लेगा या मालिकेत झळकलेली सोनल मिनोचा प्रेक्षकांना जमाई राजा या मालिकेत रिया या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रिया ही नीलची पूर्वप्रेयसी आहे. नीलच्या आयुष्यातून रिया निघून गेल्यामुळे त्याला प्रचंड धक्का लागला होता. त्यानंतर तो दारुच्या अधीन गेला होता. रिया परत आल्याने नीलच्या मनाची चांगलीच घालमेल होणार आहे. या मालिकेतील माझी भूमिका खूपच रंजक असून माझ्या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार असल्याचे ती सांगते.