'गोठ'च्या बयोआजी म्हणजेच नीलकांती पाटेकर बनल्या सिक्रेट सॅन्टा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 14:14 IST2017-12-29T08:44:04+5:302017-12-29T14:14:04+5:30
ख्रिसमसमुळे सगळीकडे सिक्रेट सांताक्लॉजची चर्चा आहे. प्रत्येक ऑफिस मध्ये कर्मचारी सिक्रेट सॅन्टा बनून आपल्या सहकर्मचाऱ्यांसाठी काही ना काही तरी ...
.jpg)
'गोठ'च्या बयोआजी म्हणजेच नीलकांती पाटेकर बनल्या सिक्रेट सॅन्टा!
ख रिसमसमुळे सगळीकडे सिक्रेट सांताक्लॉजची चर्चा आहे. प्रत्येक ऑफिस मध्ये कर्मचारी सिक्रेट सॅन्टा बनून आपल्या सहकर्मचाऱ्यांसाठी काही ना काही तरी गिफ्ट आणत आहेत. ऑफिसेसप्रमाणे नुकताच स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ मालिकेच्या सेटवरही सिक्रेट सांता अवतरला होता. हा सिक्रेट सांता म्हणजे मालिकेतल्या बयोआजी, अर्थात नीलकांती पाटेकर. नीलकांती पाटेकर यांनी आपल्याच स्टुडिओत केलेला कॉफी मग सगळ्यांना भेट दिला.
स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेच्या सेटवर एखाद्या कुटुंबासारखंच वातावरण असतं. त्यामुळे विविध सण-उत्सव इथे उत्साहाने साजरे केले जातात. ख्रिसमसही त्याला अपवाद नव्हता. आपल्या मालिकेची काहीतरी आठवण सर्वांकडे राहावी या हेतूने नीलकांती पाटेकर यांनी सर्वांना कॉफी मग भेट दिला. अचानकपणे मिळालेल्या गिफ्टने सगळेच खुश झाले. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्राबनी देवधर यांच्यासह सर्वांनाच नीलकांती पाटेकर यांनी ख्रिसमसची खास भेट दिली. हा कॉफी मग लाल रंगाचा असून त्यावर सोनेरी रंगात गोठ हे मालिकेचे नाव लिहिलेले आहे. या मग पाहून सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. सगळ्यांनी या गिफ्टसाठी नीलकांती पाटेकर यांचे आभार मानले. तसेच सगळ्यांनी या कॉफी मग सोबत आपले फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले. नीलकांती पाटेकर यांनी दिलेली ही भेट आयुष्याभर सगळ्यांच्या लक्षात राहाणार यात काहीच शंका नाही. याविषयी नीलकांती पाटेकर सांगतात, आमच्या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबासारखीच आहे. त्यामुळे सर्वांबरोबर आनंद शेअर करताना बरं वाटतं. म्हणूनच मी माझ्या स्टुडिओत तयार केलेला कॉफी मग भेट म्हणून सगळ्यांना दिला. या मगवर गोठचा लोगो आणि गोठ दागिन्याचे डिझाईन आहे. या निमित्ताने आमच्या मालिकेची एक आठवण तयार झाली.'
गोठ या मालिकेच्या सेटवर नेहमीच काही ना काही धमाल मस्ती सुरू असते. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर आइस्क्रिम पार्टी झाली होती. या मालिकेच्या टीममधील कलाकारांनी मालिकेच्या सेटवर मनसोक्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला होता. रुपल नंद, नीलकांती पाटेकर, सुप्रिया विनोद, समीर परांजपे या सगळ्याच कलाकारांनी आइस्क्रीमवर ताव मारला होता.
Also Read : गोठ मालिकेतील सुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल करतेय उपचार