हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर अभिनेत्याची मराठी मालिकेत दमदार एन्ट्री; कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:40 IST2024-02-14T13:37:58+5:302024-02-14T13:40:14+5:30
हिंदी मालिकाविश्व गाजवणारा मराठमोळा चेहरा अक्षय म्हात्रे झी मराठीवरील या नव्या मालिकेमधून पुनरागमन करणार आहे.

हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर अभिनेत्याची मराठी मालिकेत दमदार एन्ट्री; कोण आहे तो?
Zee Marathi new Serials : हल्ली टीआरपीसाठी मराठी वाहिन्यांवर एकामागोमाग एक नवीन मालिकांचा सपाटा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या या दुनियेत मनोरंजनाची वेगवेगळी माध्यमे उपलब्ध आहेत. तरीही मालिका हा गृहिणींच्या जवळचा विषय असतो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर झी मराठीने मालिकाप्रेमींसाठी मनोरंजनाची मेजवाणीच आणली आहे.
अलिकडेच झी मराठीने दोन नव्याकोऱ्या मालिकांचा प्रोमो प्रदर्शित केला. दरम्यान १२ फेब्रुवारीला 'पारू' आणि 'शिवा' या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. 'पारु' आणि 'शिवा' या मालिकांच्या प्रक्षेपणाला सुरुवात देखील झाली आहे. त्यानंतर आता झी मराठीने पुन्हा आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे.
हिंदी मालिकाविश्व गाजवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापट हा झी मराठीच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या आगामी मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती मिळतेय. शर्मिष्ठा राऊत तसेच तेजस देसाई निर्मित मालिकेत राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
तसेच ‘झी मराठी’वर सुरू होणाऱ्या दुसऱ्या नवीन मालिकेचं नाव देखील ,समोर आलंय. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ असं या मालिकेचं नाव आहे. अभिनेता अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका झी टीव्हीवरील पुनर्विवाह या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे या मालिकांचे कथानक प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.