'नवीन जन्मेन मी…' मालिका एका नव्या वळणावर; स्वानंदीच्या बाबतीत घडली अघटित घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:51 IST2024-02-15T18:51:02+5:302024-02-15T18:51:15+5:30
Navin Janmen Mi : आयुष्य आनंदाने जगणाऱ्या आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवणाऱ्या स्वानंदीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे.

'नवीन जन्मेन मी…' मालिका एका नव्या वळणावर; स्वानंदीच्या बाबतीत घडली अघटित घटना
मुलींचं आयुष्य अनेकदा इतक्या नाजूक वळणावर असतं की त्यांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलावं लागतं. मग ते वयात येणं असो शिक्षण असो नोकरी/नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या ठिकाणी जाणं असो किंवा संसार असो. बऱ्याच मुली स्वत:च्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वत:चं आयुष्य देखील सुरळीतपणे चालवत असतात पण नेमकं असं काही घडतं की ज्यामुळे आयुष्यापुढे मोठा प्रश्न उभा राहतो. असंच काहीसं घडलंय ‘नवीन जन्मेन मी…’ (Navin Janmen Mi) या मालिकेतील स्वानंदीच्या बाबतीत.
आयुष्य आनंदाने जगणाऱ्या आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवणाऱ्या स्वानंदीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. एका पार्टीत स्वानंदीच्या बाबतीत अघटित घटना घडली आणि त्यानंतर तिच्यासमोर एक भयंकर प्रश्न उभा राहिला की तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण? या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरी जाणार या विचारांनी जरी स्वानंदीला घेरलं असलं तरी नियतीच्या कचाट्यात अडकलेली स्वानंदी आता रडणार नाही तर लढणार आणि सत्याच्या संघर्षात स्वत: पुन्हा नव्याने घडणार आहे.
स्वत: मध्ये असलेली जिद्द, धमक यामुळे स्वानंदी तिचा हा अडचणीचा रस्ता हिमतीने पार करणार हे नक्की. स्वानंदीच्या आयुष्याचा नवा प्रवास अनुभवण्यासाठी ‘नवीन जन्मेन मी…’ मालिका पाहावी लागेल.