'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजची नवी मालिका, प्रोमोमध्ये दिसली झलक, चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:14 IST2025-12-04T11:13:48+5:302025-12-04T11:14:08+5:30
झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावरुन नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नायक आणि नायिका दिसत आहेत. पण, त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

'नवरी मिळे हिटलरला' फेम वल्लरी विराजची नवी मालिका, प्रोमोमध्ये दिसली झलक, चाहते म्हणाले...
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. या मालिकेत लीलाची भूमिका साकारून अभिनेत्री वल्लरी विराज घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. १ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला होता. आता वल्लरीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. 'नवरी मिळे हिटलरला'नंतर नव्या मालिकेतून वल्लरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे वल्लरीची ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवरच सुरू होणार आहे.
झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावरुन नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नायक आणि नायिका दिसत आहेत. पण, त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. पण, प्रोमोमधील नायिकेला मात्र चाहत्यांनी ओलखलं आहे. प्रोमोमध्ये दिसणारी ही नायिका म्हणजे वल्लरी विराजच आहे. त्यामुळे वल्लरी नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे चाहतेही खूश आहेत. प्रोमोमध्ये दिसणारा अभिनेता कोण आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही.
झी मराठीची ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून नवी जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही उत्सुक आहेत. नव्या वर्षात जानेवारी महिन्यापासून ही नवी मालिका सुरू होत आहे. आता या मालिकेत हिरोच्या भूमिकेत कोण हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.