शाही विवाहसाठी नंदिनी कितील किलोच्या वजनाचे पोषख करणार परिधान ? कसा असणार 'चंद्रगुप्त नंदिनी' यांचा विवाहाचा शाही थाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 17:06 IST2016-12-02T17:06:11+5:302016-12-02T17:06:40+5:30

लवकरच छोटया पडद्यावर 'चंद्रगुप्त-नंदिनी' यांचा विवाह सोहळा रंगणार आहे.या विवाह सोहळ्याचा भव्यदिव्य असणा-या विहावाचा शाही थाट आता चर्चेचा विषय ...

Nandini for the wedding of the weight of the weight of the wedding? How to be 'Chandragupta Nandini' marital royal wedding? | शाही विवाहसाठी नंदिनी कितील किलोच्या वजनाचे पोषख करणार परिधान ? कसा असणार 'चंद्रगुप्त नंदिनी' यांचा विवाहाचा शाही थाट?

शाही विवाहसाठी नंदिनी कितील किलोच्या वजनाचे पोषख करणार परिधान ? कसा असणार 'चंद्रगुप्त नंदिनी' यांचा विवाहाचा शाही थाट?

करच छोटया पडद्यावर 'चंद्रगुप्त-नंदिनी' यांचा विवाह सोहळा रंगणार आहे.या विवाह सोहळ्याचा भव्यदिव्य असणा-या विहावाचा शाही थाट आता चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे मालिकेत राजकन्या नंदिनीची भूमिका साकारणारी  श्वेता बसू या विवाह सोहळ्यात तब्बल 12 किलो बजन असलेले पोशाख परिधान करणार आहे.यात लेहेंगा,दुपट्टा आणि दागिने यांचा समावेश आहे.मौर्यकालीन ऐश्वर्याच्या संकल्पना लक्षात घेऊन या पोशाखाची रचना करण्यात आली आहे. भरतकामाची कलाकुसर आणि झळाळते रंग यामुळे हा पोशाख आकर्षक दिसतोय. यासंदर्भात श्वेताने सांगितले, “या पोशाखाचा लेहेंगा आणि दुपट्टा याचं वजन जवळपास आठ किलो आहे. शिवाय त्यावर मी घालणार असलेल्या दागिन्यांचं वजन तीन ते चार किलो भरेल ! म्हणजे मी तब्बल 12 किलोचा वधूचा पोशाख घालून मिरवणार आहे. या पोशाख बनवलतांना बारकाईने लक्ष  देण्यात आले आहे. इतका सुंदर लेहंगा मी पहिल्यांदाच घालत असून मला हा पोशाख अतिशय आवडला आहे''.निर्माती एकता कपूरने या मौर्यकालीन शाही विवाहाच्या भव्यतेची कुठलीही कसर ठेवलेली नाही. या शाही विवाहाचे हळद, संगीत आणि प्रत्यक्ष विवाह सोहळा असे तीन प्रमुख भाग असतील. यातील संगीताच्या कार्यक्रमासाठी थेट मगधहून (जेथे मौर्य राजघराण्याची स्थापना झाली) आणलेल्या शास्त्रीय नर्तकांना या सोहळ्यात समाविष्ट करून घेणार आहेत.सूत्रानुसार, प्रेक्षकांना या विवाहाविषयी उत्सुकता वाढावी यासाठी निर्मात्यांनी काही योजना आखल्या आहेत. चंद्रगुप्त आणि नंदिनी यांच्या विवाहानंतरच या दोघांच्या जीवनाचा आणि मालिकेचाही खºया अर्थाने प्रारंभ होईल. या सोहळ्यात शाही संगीताचा कार्यक्रम होणार असून, त्यात नर्तकांचा सहभाग महत्त्वाचा असेल. ते काही पारंपारिक नृत्य सादर करतील. त्यांचे कपडेही मौर्यकालीन असतील. चंद्रगुप्त मौर्य आणि राजकन्या नंदिनी यांच्या विवाहास मगधमधल सर्व शास्त्रीय नर्तक आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.या शाही लग्नानंतर ही मालिका एक वेगळेच वळण घेताना दिसणार आहे. शाही थाट असलेल्या लग्नसाठी जितकी मेहनत श्वेता बासू म्हणजे नंदिनीच्या लुकवर मेहनत घेण्यात आलीय तितकीच रजत टोकस साकारत असलेला चंद्रगुप्त मौर्यच्या लुकवरही घेण्यात  आलीय, त्यामुळे हा शाही विवाह छोट्या पडद्यावर पाहणे रसिकांसाठी रंजक ठरणार आहे.

Web Title: Nandini for the wedding of the weight of the weight of the wedding? How to be 'Chandragupta Nandini' marital royal wedding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.