नम्रता संभेरावनं चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:13 IST2025-01-26T18:13:25+5:302025-01-26T18:13:49+5:30
प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव.

नम्रता संभेरावनं चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाली...
अफलातून अभिनय आणि विनोदाची अचूक सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao) . महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) शोमधून नम्रता संभेराव (Namrata Sambherao) घराघरात पोहचली. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांतून तिनं मोठं नाव कमावलं आहे. अशातच आता नम्रताला 'सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री'चा पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
नम्रता संभेरावचा 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma Movie) हा चित्रपट १ मे २०२४ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात तिनं 'आशा' या घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेचं प्रचंड कौतुक झालं. याच भूमिकेसाठी नम्रताला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
नम्रातानं पोस्ट शेअर करत लिहलं, :2025 मधील माझं पहिलं पारितोषिक. नाच गं घुमा ह्या सिनेमावर आणि माझ्या पात्रावर आशा ताई वर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं ही त्या कामाची पावती. आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री म्हणून चित्रपटासाठी मिळालेला माझा पहिला award. मुक्ता ताई...दिग्दर्शक परेश मोकाशी सर , लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि माझे निर्माते स्वप्निल जोशी तेजस शर्मिष्ठा तृप्ती मधुगंधा ताई परेश सर आणि माझी संपूर्ण टीम thanks to all of you", अशा शब्दात तिनं भावना व्यक्त केल्यात. नम्रताच्या या पोस्टवर तिच्या लाखो चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केलाय. नम्रता तिला मिळणारं हे प्रेम बघून अक्षरश: भारावून गेली आहे.