सांगलीच्या ढाब्यावर नम्रता संभेरावनं सहकलाकारांसाठी बनवलं जेवण, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:39 IST2025-08-07T20:39:03+5:302025-08-07T20:39:28+5:30

Namrata Sambherao : नुकतेच सांगली येथे प्रयोगासाठी जाताना नम्रताने एका ढाब्यावर तिच्या टीमसाठी जेवण बनवलं. त्याचा व्हिडीओ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने शेअर केला आहे.

Namrata Sambherao cooked food for her co-stars at a dhaba in Sangli, fans are praising her after watching the video | सांगलीच्या ढाब्यावर नम्रता संभेरावनं सहकलाकारांसाठी बनवलं जेवण, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक

सांगलीच्या ढाब्यावर नम्रता संभेरावनं सहकलाकारांसाठी बनवलं जेवण, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक

अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शो व्यतिरिक्त सिनेमातूनही तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्रीचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे. सध्या तिचा थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या प्रयोगाचे दौरे सुरू आहेत. नुकतेच सांगली येथे प्रयोगासाठी जाताना नम्रताने एका ढाब्यावर तिच्या टीमसाठी जेवण बनवलं. त्याचा व्हिडीओ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने शेअर केला आहे. 

प्रसाद खांडेकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते एका ढाब्यावर आहेत आणि तिथे त्यांच्या स्वयंपाकघरात नम्रता संभेराव जेवण बनवताना दिसते आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अन्नपूर्णा नम्रता. सांगलीला प्रयोगाला जाताना शॉपिंगमुळे थोडा उशीर झाला आणि जेवणाचे वांदे झाले.... जवळ जवळ सगळ्या हॉटेल्स मधील शेफ लंच टाईम होऊन गेल्यामुळे निघून गेलेले शेवटी एका ढाब्यावर मालकाची परवानगी घेऊन आमच्या नमाने थेट किचनचा ताबा घेतला. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नम्रता संभेरावच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकाने लिहिले की, आहेच मुळी नमा ताई सर्व गुण संपन्न. दुसऱ्या एकाने लिहिले की, या खरंच खूप गोड स्वभावाच्या आहेत. आणखी एकाने लिहिले, साधी आणि संयमी.

'थेट तुमच्या घरातून' नाटकाबद्दल
प्रसाद खांडेकर लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या प्रयोगाचे सध्या महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत. यात प्रसाद आणि नम्रता व्यतिरिक्त भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

Web Title: Namrata Sambherao cooked food for her co-stars at a dhaba in Sangli, fans are praising her after watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.