​नकुशीमध्ये होणार रणजीतच्या पहिल्या पत्नीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 13:19 IST2017-04-05T07:49:30+5:302017-04-05T13:19:30+5:30

नकुशी... तरीही हवीहवीशी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील नकुशी आणि रणजीतची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड ...

Nakushi will be the first wife of Ranjeet's entry | ​नकुशीमध्ये होणार रणजीतच्या पहिल्या पत्नीची एंट्री

​नकुशीमध्ये होणार रणजीतच्या पहिल्या पत्नीची एंट्री

ुशी... तरीही हवीहवीशी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील नकुशी आणि रणजीतची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. नकुशी आणि रणजीत नुकतेच मनालीला फिरायलादेखील जाऊन आले आहेत. मनालीला गेल्यानंतर त्यांच्यात आणखीनच जवळीक निर्माण झाली आहे. पण आता त्यांच्या नात्यात एक वादळ निर्माण होणार आहे. 
रणजीतची पहिली पत्नी त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. रणजीतच्या पहिल्या पत्नीचे नाव शेरनाझ असून ती एक पारसी मुलगी आहे. ती आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगणारी मुलगी आहेत. रणजीत आणि तिचा प्रेमविवाह झाला होता. पण काही कारणास्तव त्या दोघांमध्ये बिनसले. शेरनाझ नेहमीच मोठी स्वप्नं पाहात असल्याने तिला चाळीत राहाणे पसंत नव्हते. प्रसिद्ध अभिनेत्री अथवा प्रसिद्ध मॉडेल बनण्याची तिची इच्छा होती. तिला कधीच कोणाच्या भावनांची पर्वा नव्हती. त्यामुळे तिला एका हिंदी मालिकेची ऑफर आल्याने ती अभिनेत्री बनण्यासाठी रणजीतला सोडून गेली होती. पण आता तिच्या निर्मात्याने तिला फसवल्यामुळे ती रणजीतच्या आयुष्यात परत आली आहे. रणजीतने आपल्याला परत स्वीकारावे अशी तिची इच्छा आहे आणि यासाठी ती रणजीत आणि नकुशीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करणार आहे. 
शेरनाझ ही भूमिका या मालिकेत शिविका तनेजा ही अभिनेत्री साकारणार असून अनेक मुलींच्या ऑडिशनमधून तिची निवड करण्यात आली आहे. शिविका चंडिगढमध्ये लहानाची मोठी झाली असल्याने तिला अजिबातच मराठी येत नाही. शिविकाचा लूक, तिचे वागणे आणि तिची बोलण्याची ढब या सगळ्यामुळे शेरनाझ या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. 



Web Title: Nakushi will be the first wife of Ranjeet's entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.