नव्या बंधनात अडकणार नागराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 12:08 IST2016-05-16T06:38:59+5:302016-05-16T12:08:59+5:30

कोणत्याही यशस्वी पुरुषामागे महिलेचा हात असतो हे आपण वारंवार ऐकलंय आणि अनुभवलंय. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आलीय ती सैराटच्या ...

Nagraj caught in a new bond? | नव्या बंधनात अडकणार नागराज ?

नव्या बंधनात अडकणार नागराज ?

णत्याही यशस्वी पुरुषामागे महिलेचा हात असतो हे आपण वारंवार ऐकलंय आणि अनुभवलंय. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आलीय ती सैराटच्या निमित्ताने. सैराटच्या यशामागे नागराज मंजुळे यांच्या या यशामागे खरी मास्टरमाइंड ही एक महिला आहे.. नागराज यांच्या यशाची शिल्पकार लवकरच त्यांच्या जीवनाची साथीदार बनणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.. नागराज यांच्या यशातील वाटेकरी असणारी 'ती' महिला  'झी मराठी' ची  असिस्टंट प्रोमो प्रोड्युसर होती. 'फँड्री', 'पिस्तुल्या' आणि आता 'सैराट'च्या तुफान यशाची खरी सूत्रधारही  'ती'च असल्याचं बोललं जातंय.

आधी झी मराठीमध्ये असिस्टंट प्रोमो प्रोड्युसर म्हणून काम करणारी 'ती'  महिला 'फँड्री'पासून नागराजसोबत आली. 'ती'नंच नागराज आणि निखील साने यांची भेट घडवून आणल्याचंही सांगितलं जातंय. फँड्रीच्या यशानंतर नागराज यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. तिला सात लाखाची पोटगीसुद्धा दिली. तेव्हापासून नागराज मंजुळेेंला या असिस्टंट प्रोड्युसरची साथ लाभली.

आता सैराट रुपेरी पडद्यावर झिंगाट यश मिळवतो आहे. सैराटच्या या यशामागेही 'तीचा' सिंहाचा वाटा असल्याचं बोललं जातंय. एखादा शॉट घेण्यापासून ते प्रसिद्धीपर्यंत सगळ्याच गोष्टी या प्रोड्युसरनं पाहिल्या. आता सैराट यशानंतर नागराज आणि 'ती'चं नातं आणखी घट्ट झाल्याचं बोललं जातंय.. त्यामुळं हे  दोघंही लवकरच बंधनात अडकणार असल्याचं कळतंय.

Web Title: Nagraj caught in a new bond?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.