कुणी तरी येणार गं! टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:03 IST2025-12-04T10:02:37+5:302025-12-04T10:03:15+5:30
टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आशका गोराडिया दुसऱ्यांदा आई होणार आहे.

कुणी तरी येणार गं! टीव्ही अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई
टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया हिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आशका गोराडिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत आशकाने ही गोड बातमी सांगितली आहे. हटक्या पद्धतीने आशकाने प्रेग्नंसीची न्यूज दिली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. आशका ४०व्या वर्षी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
आशकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समुद्र दिसत आहे. बीचवर दोन मोठे योगा मॅट दिसत आहेत. त्यानंतर आधी एक छोटा योगा मॅट येतो आणि मग आणखी एक योगा मॅट येत असल्याचं दिसत आहे. हे दोन छोटे योगा मॅट म्हणजे आशकाची मुलं आहेत. "दुसरा बीच बेबी येत आहे", असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मे २०२६ मध्ये आशका तिच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. "आम्ही आमच्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहोत. तुमचे आशीर्वाद असेच राहु द्या", असं तिने म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आशकाने २००२ मध्ये तिच्या अभिनय क्षेत्रातील करियरला सुरुवात केली होती. 'कुसुम', 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे', 'शुभविवाह', 'लागी तुझसे लगन' यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली होती. 'नागिन' मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. 'बिग बॉस ६'मध्येही ती सहभागी झाली होती. 'झलक दिखला जा', 'खतरों के खिलाडी', 'नच बलिए' या रिएलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता. २०१७ मध्ये आशकाने ब्रेंट गोबले यांच्यासोबत ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न करत संसार थाटला. २०२३ मध्ये तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. सध्या ती कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.