नागिन-3 सुद्धा येणार रसिकांच्या भेटीला ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:27 IST2016-08-19T08:57:16+5:302016-08-19T14:27:16+5:30
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका 'नागिन' रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. त्यामुळं त्याच्या सिक्वेलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. लवकरच सप्टेंबरपासून ...

नागिन-3 सुद्धा येणार रसिकांच्या भेटीला ?
छ ट्या पडद्यावर गाजलेली मालिका 'नागिन' रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. त्यामुळं त्याच्या सिक्वेलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. लवकरच सप्टेंबरपासून 'नागिन-2' रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र 'नागिन-2' या मालिकेचं आगमन होण्याआधीच 'नागिन-3'ची चर्चा सुरु झालीय. कारण नागिन-3 मध्ये भूमिका साकारणार असल्याचं नागिन मालिकेच्या पहिल्या सीझनमधील अभिनेता अर्जुल बिजलानीनं म्हटलंय. नागिनच्या यशानंतर दुस-या सीझनमध्ये अर्जुनची वर्णी लागलेली नाही. सध्या तो 'झलक दिखला जा-9'मध्ये पाहायला मिळतोय. मात्र नागिन-2मध्ये वर्णी का लागली नाही याबद्दल विचारलं असता त्यानं आपण नागिन-3 मध्ये झळकणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं नागिन मालिकेच्या फॅन्ससाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल.