Nach Baliye 8 winners : ​ दिव्यांका- विवेक म्हणाले, आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 13:03 IST2017-06-26T07:33:38+5:302017-06-26T13:03:38+5:30

 - रूपाली मुधोळकर छोट्या पडद्यावरील सुपरस्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहियाच्या जोडीने ‘नच बलिये 8’चा किताब मिळवला ...

Nach Baliye 8 winners: Diwali-Vivek said, we had to win and we won! | Nach Baliye 8 winners : ​ दिव्यांका- विवेक म्हणाले, आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो!

Nach Baliye 8 winners : ​ दिव्यांका- विवेक म्हणाले, आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो!

ong> - रूपाली मुधोळकर

छोट्या पडद्यावरील सुपरस्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहियाच्या जोडीने ‘नच बलिये 8’चा किताब मिळवला आहे.   सनाया इरानी- मोहित सहगल आणि सनल-अबीगेल या दोन जोड्यांना मागे टाकत दिव्यांका आणि विवेक ‘नच बलिये’च्या ट्राफीवर आपले नाव कोरले. या विजयानंतर दिव्यांका व विवेकने लोकमत-सीएनएक्समस्तीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो,असे दिव्यांका व विवेक यावेळी सांगितले.



  ‘नच बलिये 8’चा किताब जिंकल्यानंतर कसे वाटतेय? असा प्रश्न दिव्यांका आणि विवेक या दोघांना केला असता, दोघांनाही अगदी आनंदात जल्लोष केला. आम्ही खूप आनंदात आहोत. आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो. त्यासाठी अफाट मेहनत घेतली. समोर ती ट्राफी दिसायची तेव्हा ही घरी न्यायचीच, या एकाच विचाराने मला ग्रासले होते आणि आता ही ट्राफी आमच्या समोर आहे. आमच्या हातात आहे, असे दिव्यांका म्हणाली.

 तुम्हा दोघांना या विजयाच्या मुक्कामाला पोहोचवणारी एक अशी कुठली गोष्ट होती, असे तुम्हाला वाटते? यावर दिव्यांका व विवेक दोघांचेही उत्तर एकच होते. ते म्हणजे, प्रचंड जीवतोड मेहनत. दिव्यांका व मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुरुवातीला हेल्थ प्रॉब्लेस आलेत. पण आम्ही सगळ्यांवर मात केली. भूक, तहान, झोप असे सगळे विसरून आम्ही प्रॅक्टिस केली. या मेहनतीचे फळ मला व दिव्यांकाला मिळाले, असे विवेक म्हणाला.
हा विजय कसा सेलिब्रेट करणार आहात? या प्रश्नावर तर दोघांचीही कळी खुलली. आमची फॅमिली आमच्यासोबत आहे. आम्ही आता मज्जा करणार आहोत. याशिवाय मस्तपैकी ताणून झोप काढणार आहोत, असे दिव्यांकाने सांगितले.

या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा अनुभव एका वाक्यात सांगायचा झाल्यास कसा सांगणार, यावर दिव्यांका फुल्ल रोमॅन्टिक झाली. रोमॅन्टिक गाण्यांवर डान्स करता करता रोमान्स आणखी वाढला, असे दिव्यांका म्हणाली. विवेकने तर यावर अगदी सिक्सर मारला. माझ्या परफेक्ट बायकोत मला एक इम्परफेक्ट बायको सापडली आणि माझे तिच्यावरचे प्रेम आणखी वाढले, असे तो म्हणाला. यावेळी दिव्यांका व विवेक दोघांनीही चाहत्यांचे मनापासून आभार मानले. आजचा हा विजय खºया अर्थाने आमच्या चाहत्यांचा विजय आहे. त्यांचे प्रेम आणि लोभ यामुळे आम्ही ‘नच बलिये’चे सीझन जिंकू शकला. यापुढेही चाहत्यांचे असे प्रेम आम्हाला मिळो, असे दोघेही म्हणाले. यापुढे कुठलाही रिअ‍ॅलिटी शो करण्याचा प्लान नाहीयं, हे सांगायलाही दोघे विसरले नाहीत.

Web Title: Nach Baliye 8 winners: Diwali-Vivek said, we had to win and we won!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.