​सरस्वती मालिकेत देविकासमोर उलगडणार हे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 16:08 IST2017-09-14T10:38:50+5:302017-09-14T16:08:50+5:30

सरस्वती मालिकेला काहीच दिवसांपूर्वी चांगलेच वळण मिळाले आहे. सरस्वती आणि राघव हे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत असल्याने ते एकमेकांपासून ...

The mystery that will unfold in front of Devika in the Saraswati series | ​सरस्वती मालिकेत देविकासमोर उलगडणार हे रहस्य

​सरस्वती मालिकेत देविकासमोर उलगडणार हे रहस्य

स्वती मालिकेला काहीच दिवसांपूर्वी चांगलेच वळण मिळाले आहे. सरस्वती आणि राघव हे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत असल्याने ते एकमेकांपासून दूर होतील असे कोणालाच वाटले नव्हते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
या मालिकेत राघवचा मृत्यू झाल्याचे आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले. राघव आणि सरस्वती दुबईला फिरायला गेले असता राघववर हल्ला झाला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे सरस्वती पूर्णपणे तुटली. पण काहीच दिवसांपूर्वी राघव मालिकेत परतला आहे. राघव परत आल्यावर आता पूर्णपणे परिस्थिती बदलली असे सरस्वतीला वाटत होते. ती खूपच आनंदात होती. पण राघव परत आल्यानंतर पूर्णपणे बदलला आहे. सरस्वतीचा तो रागराग करत आहे. एवढेच नव्हे तर आता त्याने देविकासोबत लग्न देखील केले आहे. देविका राघवच्या वाड्यात राहात आहे तर त्याच वाड्यात सरस्वती मोलकरणीचे काम करत आहे. देविकाच्या लग्नाला अनेक दिवस झाले असले तरी सरस्वती हीच राघवची पत्नी असल्याचे तिला माहीत नाहीये. सरस्वती आणि देविका यांच्यात खूप चांगली मैत्री देखील आहे. पण आता देविकासमोर एक रहस्य उलगडणार आहे आणि त्यामुळे तिला चांगलाच धक्का बसणार आहे.
राघवचे पहिले लग्न झालेले होते याची कल्पना देविकाला आहे. पण राघवचे कोणासोबत लग्न झाले होते हे तिला माहीत नाही. तिने ही गोष्ट अनेक वेळा वाड्यातील लोकांना विचारायचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाने तिला याबद्दल सांगणे टाळले. पण आता
सरस्वती हीच राघवची पत्नी असल्याचे देविकाला कळणार आहे आणि त्यानंतर या मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.
सरस्वती या मालिकेत तितिक्षा तावडे सरस्वतीची, अस्ताद काळे राघवची तर जुई गडकरी देविकाची भूमिका साकारत आहे. तितिक्षा आणि अस्ताद या मालिकेच्या सुरुवातीपासूनच या मालिकेचा भाग असून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या दोघांनाही मिळत आहे. तसेच जुईची एंट्री झाल्यापासूनच तिची व्यक्तिरेखा, अभिनय प्रेक्षकांना भावत आहे. 

Also Read : सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

Web Title: The mystery that will unfold in front of Devika in the Saraswati series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.