चिमुकल्या मायराचा गुलाबी नऊवारी साडीत क्यूट डान्स! नटखट हावभावांनी घातली भूरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 19:37 IST2023-09-07T19:35:41+5:302023-09-07T19:37:19+5:30
चिमुकल्या मायराने 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर डान्स करत भुरळ घातली.

Myra Vaikul
सध्या सोशल मीडियावर एक गाणं प्रचंड व्हायरल होतंय. अनेक छोटी छोटी मुलं त्यावर रील्स बनवताना दिसतायत. ते गाणं म्हणजे 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'. या गाण्यावर आता चिमुकल्या मायराने देखील डान्स करत प्रेक्षकांना भुरळ घातली. चिमुकल्या मायराचा क्युट व्हिडीओ चाहत्यांना पंसत पडला आहे.
मायराच्या इन्स्टावर तिचा हा क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तीने गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. नऊवारी साडीतील लूकवर मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे. यासोबत काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत तीने आईसोबत ट्विनिंग केल्याचे दिसत आहे.
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकातून मायरा घराघरात पोहचली. या मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळने ‘परी’ची भूमिका साकारली होती. निरागस अभिनयाने मायराने सर्वांचे मन जिंकले. सध्या मायरा ‘नीरजा एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे.