'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:25 IST2022-03-04T12:24:42+5:302022-03-04T12:25:25+5:30
Mazi Tuzi Reshimgath : एकीकडे 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत रंजक घडामोडी घडत असतानाच मालिकेतून छोट्या परीने म्हणजेच लाडक्या मायरा (Myra Vaikul)ने मात्र काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेत नेहाने यशला प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता यश आणि नेहाची लव्हस्टोरी मालिकेत फुलताना दिसते आहे. एकीकडे मालिकेत रंजक घडामोडी घडत असतानाच मालिकेतून छोट्या परीने म्हणजेच लाडक्या मायरा (Myra Vaikul)ने मात्र काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. मायराच्या आजोळी तिच्या मामाच्या लग्नाची लगबग सुरू झाली असल्यानेच या खास कारणासाठी तिने थेट नाशिक गाठले आहे.
काही दिवसांपूर्वीच मायराने मालिकेतून ब्रेक घेऊन आपल्या कुटुंबासोबत कोकण ट्रिप एन्जॉय केली होती. त्यानंतर आता ती मामाच्या लग्नाला नाशिकला गेली आहे. मायराची आई श्वेता थोरात वायकुळ या मूळच्या नाशिकच्या आहेत. योगेश मामाच्या लग्नासाठी मायरा आणि तिची फॅमिली नुकतीच नाशिकला दाखल झाली आहे. नुकताच तिच्या योगेश मामाच्या हळदीचा समारंभ पार पडला. यावेळी मायराने खूप धमाल केलेली पाहायला मिळाली. हळदी समारंभाचे काही खास फोटो तिने इन्स्टग्रामवरून शेअर केले आहेत. पारंपरिक पोषाखातला मायराचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
मामाचे लग्न पार पडल्यानंतर काही दिवसातच मायरा पुन्हा मालिकेत सक्रिय होणार आहे. सध्या यश आणि नेहाची प्रेमकहाणी खुलु लागली असतानाच यशला बाबा म्हणून स्वीकारण्यास परीने नकार दिला आहे. त्यामुळे यश परीची कशी समजूत काढतो याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.