Myra Vaikul: मूर्ती लहान पण किर्ती महान, प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवत परीनंही सुरु केला स्वतःचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:55 IST2023-02-23T17:54:47+5:302023-02-23T17:55:46+5:30
Myra Vaikul: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून परीच्या रुपात बालकलाकार मायरा वायकुळ घराघरात पोहोचली आहे.

Myra Vaikul: मूर्ती लहान पण किर्ती महान, प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवत परीनंही सुरु केला स्वतःचा व्यवसाय
सध्याच्या काळात अनेक चित्रपट, मालिकांमध्ये कलाकारांसोबतच काही बालकलाकारही पाहायला मिळतात. यात काही बालकलाकार असे असतात जे त्यांच्या निरागसपणामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात आणि कायमस्वरुपी त्यांच्या स्मरणात राहतात. त्यातलीच एक बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ (Myra Vaikul). माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मायराने परीची भूमिका साकारली होती. ही मालिका बंद झाली असली तरी मायरा प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहे. सध्या मायरा एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून परीच्या भूमिकेतून मायरा वायकुळ घराघरात पोहोचली आहे. मायराचा मोठा चाहतावर्ग आहे. मायाराला नव्या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान मायराने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. मायरा मालिकेत कमबॅक करते आहे, असे तुम्हाला वाटतंय ना. पण असे सध्या तरी नाही आहे. ही गुड न्यूज म्हणजे चिमुकल्या मायराने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. 'ज्वेल्स ऑफ मायरा' असे या ब्रँडचे नाव आहे.
प्राजक्तानंतर मायरानेही या क्षेत्रात पाऊल ठेवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. मायरा वायकुळ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मायराची आई तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅन्डल करते. दरम्यान मायाराला या नव्या व्यवसायासाठी चाहते शुभेच्छा देत तिचे कौतुक करत आहेत.