MUST SEE: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील चंपकचाचाचे रिअल फॅमिली फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 14:57 IST2017-09-16T09:27:11+5:302017-09-16T14:57:11+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र गेल्या दशकभरापासून रसिकांचं मनोरंजन ...

MUST SEE: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील चंपकचाचाचे रिअल फॅमिली फोटो!
' ;तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र गेल्या दशकभरापासून रसिकांचं मनोरंजन करत आहे.मुळात या मालिकेतील सगळेच कलाकार आज लोकप्रिय आहेत.त्यामुळे प्रत्येक कलाकाराविषयी त्यांचे रिअल लाईफ गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते. आज घराघरात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा जणू काही प्रत्येक घरातील सदस्यच बनली आहेत. प्रत्येक व्यक्तीरेखेची खास बात आहे. त्यामुळे ही पात्रं गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली आहेत. यातील एक प्रमुख पात्र म्हणजे चंपकलाल जयंतीलाल गडा. मालिकेत जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारे चंपकलाल ही व्यक्तीरेखा प्रमुख भूमिका आहे. आपल्या नातवावर म्हणजेच टप्पूवर त्यांचे विशेष प्रेम आहे. वारंवार चुका करणा-या आपल्या लेकाला म्हणजेच जेठालाल याला ते सुनावतात. तितकेच ते लेकावर प्रेमही करतात. गोकुळधाम सोसायटीमधील प्रत्येकाचे ते लाडके चंपकचाचा म्हणून प्रसिद्ध आहेत. जेठालालचे बापूजी साकारणा-या चंपकलाल यांचं रिल लाइफमध्ये वय जवळपास 70 वर्ष दाखवण्यात आलं. मात्र तरीही ते तंदुरस्त आणि फिट आहेत. रिल लाइफमध्ये चंपकलाल गडा ही भूमिका साकारणारे अभिनेता अमित भट्ट हे वयोवृद्ध नाहीत. त्यांचं वय जवळपास 45 वर्ष इतके आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत चंपकलाल यांची पत्नी दाखवण्यात आलेली नाही. तिचे निधन झालं असून ते गावातून मुंबईत आपल्या लेकाकडे राहायला आलेत. रिल लाइफमध्ये अमित भट्ट यांची पत्नी दाखवण्यात आलेली नाही. मात्र रियल लाइफमध्ये अमित भट्ट यांचा मुंबईत सुखी संसार सुरु आहे. रिअल लाइफमध्ये चंपकलाल म्हणजेच अमित भट्ट यांची सुंदर अशी पत्नी आहे. अमित यांना दोन मुलंही आहेत. विशेष म्हणजे ही जुळी मुलं आहेत. आपल्या सुंदर पत्नी आणि मुलांसह अमित भट्ट मुंबईत आनंदाने राहत आहेत. चंपकलाल या भूमिकेने अमित भट्टला फक्त लोकप्रियताच मिळवून दिली नाही तर आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनवले आहे.
Also Read:पत्रकार पोपटलालचे रिअल फॅमिली फोटो !
Also Read:पत्रकार पोपटलालचे रिअल फॅमिली फोटो !