संगीतप्रेमींसाठी 'संगीत सम्राट' एक अनोख व्यासपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 16:13 IST2017-06-26T10:35:11+5:302017-06-26T16:13:25+5:30

संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा ...

'Music Emperor' is a unique platform for music fans | संगीतप्रेमींसाठी 'संगीत सम्राट' एक अनोख व्यासपीठ

संगीतप्रेमींसाठी 'संगीत सम्राट' एक अनोख व्यासपीठ

गीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर झी युवावर वाहिनीवर संगीत सम्राट हा अनोखा संगीतमय कार्यक्रम सुरु होणार आहे. अनेक कलावंत संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर करणार आहेत. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर वानखडे हे दोघे या कार्यक्रमाच्या परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर करणार आहेत. 

कलाकाराच्या कलेचे चीज करणारी पारख नजर असेल तर समाजातील कोणताही कलाकार रसिकांसमोर येऊ शकतो या विश्वासातून झी युवाने “संगीत सम्राट” या संगीतावर आधारीत वेगळ्या संकल्पनेला आकार दिला आहे. झी युवा आणि झी टॉकीज चे व्यवसाय प्रमुख 'बवेश जानवलेकर' यांनी “संगीत सम्राट” या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले की, "मराठी प्रेक्षकांची संगीत क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन फार कमी कार्यक्रम आजवर छोट्या पडद्यावर आले आहेत. सर्वसामान्यांमध्ये दडलेला आणि संगीताशी नाळ जोडलेला कलाकार समाजासमोर यावा, त्याचप्रमाणे कलाकारांसोबत चांगला श्रोता घडावा या हेतूने, गेल्या महिन्याभरापासून या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. महाराष्ट्रातील ६ शहरांमध्ये झालेल्या निवडचाचणीला हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली होती.  मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांमध्ये निवडचाचणी पार पडली. ज्यांच्या श्वासात संगीत आहे अश्या कलाकारांसाठी संगीत सम्राट एक नवीन व्यासपीठ घेऊन आले आहे.

"संगीत सम्राट "या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना अश्या अनेक कलाकारांना भेटायला मिळणार आहे ज्यांच्या संगीतमय आयुष्याचा  प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरू शकेल . यात असे कलावंत आहेत जे अगदी हलाखीच्या परिस्थितीतही आपली संगीत साधना जोपासली आहे. तर काही स्पर्धकांच्या जवळच्या लोकांनी कलेच्या यशासाठी केलेले त्याग थक्क करणारे आहेत. आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा अनोखा  मेळ या कार्यक्रमामुळे रसिक प्रेक्षकांना पाहण्याची पर्वणी झी युवाच्या "संगीत सम्राट" या कार्यक्रमामुळे  मिळणार आहे . प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ जून पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहण्याची पर्वणी मिळणार आहे

Web Title: 'Music Emperor' is a unique platform for music fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.