रमा-अक्षय एकत्र आले, मालिका संपणार? 'मुरांबा'चा नवा प्रोमो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:48 IST2024-11-27T16:48:27+5:302024-11-27T16:48:50+5:30

मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आहे. या प्रोमोमुळे मालिका संपणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

muramba star pravah serial new promo akshay and rama love wins rama arrested | रमा-अक्षय एकत्र आले, मालिका संपणार? 'मुरांबा'चा नवा प्रोमो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

रमा-अक्षय एकत्र आले, मालिका संपणार? 'मुरांबा'चा नवा प्रोमो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

'मुरांबा' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून रमा-अक्षय ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. पण, मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आहे. या प्रोमोमुळे मालिका संपणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

अक्षय-रमाच्या प्रेमात रेवा कायमच व्हिलन बनून येत असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मालिकेत रेवाचं पितळ उघडं पडल्यानंतर ती रमाच्या पायावर गोळी मारत तिचं अपहरण करत असल्याचं दाखविण्यात आलं होतं. त्यानंतर आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रेवाने रमाला एका खोलीत बांधून ठेवल्याचं दिसत आहे. रेवाने रमाच्या डोक्याला बंदूक लावल्याचं दिसत आहे. तेवढ्यात तिथे पोलीस आणि मुकादम कुटुंबीय येतात. याच संधीचा फायदा घेत रमा रेवाच्या हातातून बंदूक घेत तिला सर्वांसमोर आणते. रेवाला पोलीस घेऊन जात असल्याचं दिसत आहे. अखेर रमा आणि अक्षयच्या प्रेमाची ताकद जिंकत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. 


'मुरांबा' मालिकेचा हा प्रोमो पाहून मात्र चाहते चिंतेत आहेत. रमा-अक्षय एकत्र येत असल्याने आणि मुकादम कुटुंबातील सगळ्यांचीच मनं रमाने जिंकून घेतल्याचं दाखवल्याने मालिका निरोप घेतेय की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "मालिका संपणार आहे का?", "मालिका संपणार असं वाटतंय", "प्लीज मालिका संपवू नका" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

'मुरांबा' मालिकेत शशांक केतकर अक्षयची भूमिका साकारत आहे. तर शिवानी मुंढेकर रमाच्या आणि निशाणी बोरुले रेवाच्या भूमिकेत आहे. या मालिकेत सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी, अभिजीत चव्हाण या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: muramba star pravah serial new promo akshay and rama love wins rama arrested