ऐन तारुण्यात आजाराने घेरलं, पोटच्या लेकींना गमावलं! 'मुरांबा' फेम अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ; वाचून डोळ्यांत येईल पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:21 IST2026-01-13T12:20:01+5:302026-01-13T12:21:00+5:30
"एका रात्रीत आजार आला अन्...", मुरांबा फेम अभिनेत्रीची गंभीर आजाराशी झुंज! सांगितला तो कठीण काळ

ऐन तारुण्यात आजाराने घेरलं, पोटच्या लेकींना गमावलं! 'मुरांबा' फेम अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ; वाचून डोळ्यांत येईल पाणी
Marathi Actress Iravati Lagoo: 'मुरांबा'ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत शिवानी मुंढेकर आणि शशांक केतकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका चर्चेत असते. या मालिकेत अभिनेत्री इरावती लागू या रमाच्या आईची भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इरावती लागू यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे. त्यांना मोनोन्यूनेट्रिस मल्टिप्लेक्स हा आजार आहे.वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना या आजाराचं निदान झालं होतं.
अलिकडेच 'लोकमत सखी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इरावती लागू यांनी त्यांच्या या गंभीर आजारपणाबद्दल खुलासा केला. त्या म्हणाल्या, "मला वयाच्या १८ व्या वर्षी गंभीर आजाराचं निदान झालं आणि तो काळ पार करेपर्यंत मला पाच वर्ष गेली. पण हा काळ अत्यंत कठीण होता. हा आजार एका रात्रीत आला. सुरुवातीला माझ्या दोन्ही पायाची दोन बोटं, दोन्ही हाताची दोन बोटं यातील संवेदना गेल्या होत्या. आधी मला ते जाणवलं नाही. पण बऱ्याचदा माझ्या हातून दूध सांडलं. आधी अर्थातच त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण नंतर आईला शंका आली की सततच असं का होतंय ? तेव्हा मी तिला म्हटलं मलाही माहित नाही. एकदा मी बसमधून थेट रस्त्यावर पडले. असं बरंच काही होत होतं. शेवटी माझ्या घरच्यांना समजलं हा काहीतरी नर्व्हसचा प्रॉब्लेम असावा आणि म्हणून त्यांनी डॉक्टर रमणींची अपॉइंटमेंट घेतली."
मग पुढे त्या म्हणाल्या," त्यावेळी डॉक्टर रमणींनी मला पहिल्यांदा औषध दिली. त्यांनी मला दुसऱ्यांदा भेटायला सांगितलं पण त्यापूर्वीच मला खूप मोठा अटॅक आला आणि माझ्या दोन्ही पायाच्या संवेदना गेल्या.इतका त्रास व्हायचा की पायात नुसती आग व्हायची. ती आग थांबली की खूप त्रास व्हायचा आणि ते थांबायचं नाही. तसं तेव्हा माझं वयही लहान होतं आणि त्या वयात किती अंगावर काढणार होते. त्यावेळी नेमकं काय झालं, मुंबईत डॉक्टरांचा संप सुरु होता. हॉस्पिटलमध्ये बेड नव्हते त्यामुळे डॉक्टर म्हणाले बेडमिळेपर्यंत घरीच थांबा. असं करता-करता डिसेंबरपर्यंत मी दोन महिने रडत काढले.त्याचदरम्यान माझा आतेभाऊ घरी आला आणि त्याने माझी अवस्था बघून त्याच्या आईला सांगितलं जी एका पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तिच्या ओळखीवरून मला पुण्यात रुबी हॉलला माझी ट्रिटमेन्ट झाली. दोन दिवसात माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या तेव्हा समजलं की मला मोनोन्यूनेट्रिस मल्टिप्लेक्स हा आजार आहे. त्यात माझी एक नर्व्ह आणि तिला जोडलेल्या सगळ्या नसा डॅमेज झाल्या होत्या. हा आजार बरा होत नाही. यात वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्सने मला स्टेरॉईडसची औषध दिली. त्यामुळे माझे केस गेले. माझं वजन वाढलं, मला दिसणं बंद झालं होतं. पण जसजशी औषध बंद झाली तसं वजन कमी झालं.आजही माझ्या एका पायामध्ये संवेदना नाहीयेत पण मी चालतेय ती फक्त माझ्या इच्छाशक्तीवर."
पोटच्या लेकींना गमावलं...
या मुलाखतीत आयुष्यातीस त्या कठीण काळाविषयी सांगताना इरावती म्हणाल्या, "खरं सांगायचं झालं तर मी ठरवलं होतं की या आजारातून बाहेर आल्यानंतर आपण लग्न नाही करायचं. या आजारपणात घेतलेल्या स्टिरॉईड्समुळे मला सांगितलं होतं की त्यामुळे तुला मुलं होणार नाहीत.लग्न झाल्यानंतर मी अनेक डॉक्टरांकडे गेले त्यातील प्रत्येकाने मला सांगितलं होतं, की तुला मुल होणार नाही. पण पुण्याचे अविनाश फडणीस आहेत, त्यांनी मला सांगितलं हो... तुम्हाला मुलं होतील. सगळं छान झालं. पहिल्या गरोदरपणात दोन मुली राहिल्या.सातव्या महिन्यापर्यंत सगळं व्यवस्थित झालं आणि त्यामधील एक बेबी रप्चर झालं. याच्यात सुद्धा मी एक महिना लढले. पण, सातव्या महिन्यात माझ्या दोन्ही मुली गेल्या. मी रडत बसले नाही, कारण त्या गोष्टी आमच्या हातातच नव्हत्या."