स्विमिंगपूलमध्ये बोल्ड झाली 'मुरांबा' फेम अभिनेत्री, शेअर केला सगळ्यात हॉट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:42 IST2025-08-08T13:42:04+5:302025-08-08T13:42:35+5:30
निशाणी मालिकेत काम करत नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

स्विमिंगपूलमध्ये बोल्ड झाली 'मुरांबा' फेम अभिनेत्री, शेअर केला सगळ्यात हॉट व्हिडीओ
'मुरांबा' ही स्टार प्रवाहा वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका. सुरुवातीपासूनच या मालिकेला चाहत्यांचं प्रेम मिळालं. आणि मालिकेतील रमा, अक्षय, रेवा या त्रिकुटाने अगदी कमी काळातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत रेवा हे खलनायिकेचं पात्र अभिनेत्री निशाणी बोरुले साकारत होती. आता निशाणी मालिकेत काम करत नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
निशाणी सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. सध्या निशाणी व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या अकांऊवरुन निशाणीने स्विमिंगपूलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये निशाणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. बिकिनी घालून निशाणी पूलमध्ये उतरली आहे. तिच्या या हॉट व्हिडीओवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
निशाणी कायमच तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. अनेकदा निशाणी हॉट फोटोंमधून तिच्या ग्लॅमरस अदा दाखवत असते. निशाणीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 'मुरांबा'मध्ये रेवा हे खलनायिकेचं पात्र साकारून तिने प्रसिद्धी मिळवली. तिने साकारलेल्या खलनायिकेलाही प्रेक्षकांनी पसंत केलं. आताही चाहते तिला मालिकेत मिस करतात.