आयशा आणि नाझिलानंतर मुनव्वर फारुकी डेट करतोय 'या' लोकप्रिय व्यक्तीला ? व्हिडीओ तूफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 08:35 IST2024-04-14T08:33:01+5:302024-04-14T08:35:53+5:30

मुनव्वर फारुकी हा तूफान चर्चेत आला आहे.

Munawar Faruqui Is Dating Cosmetologist, Aashna Kanchwala? Their Cosy Video Viral | आयशा आणि नाझिलानंतर मुनव्वर फारुकी डेट करतोय 'या' लोकप्रिय व्यक्तीला ? व्हिडीओ तूफान व्हायरल

आयशा आणि नाझिलानंतर मुनव्वर फारुकी डेट करतोय 'या' लोकप्रिय व्यक्तीला ? व्हिडीओ तूफान व्हायरल

'बिग बाॅस 17' चा विजेता झाल्यापासून मुनव्वर फारुकी हा तूफान चर्चेत आला आहे. विशेष बाब म्हणजे मुनव्वर फारुकीच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झालीये. मुनव्वर फारुकी याच्यावर 'बिग बाॅस 17' मध्ये असताना अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मुनव्वर फारुकी याची एक्स आयशा खान देखील 'बिग बाॅस 17' मध्ये सहभागी झाली होती. तिने मुनव्वरवर डबल डेटिंगचा आरोप केला होता. ज्यानंतर मुनव्वर फारुकी चाहतेही हैराण झाले. मुनव्वर फारुकी हा एकाच वेळी दोन मुलींना डेट करत होता.

मल्टिपल डेटिंगमुळे अनेकदा ट्रोलिंगचा बळी ठरलेल्या मुनव्वर फारुकीचं नाव आता एका नव्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. अलीकडेच मुनव्वरनं त्याच्या मित्रांसोबत ईद साजरी केली. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, परंतु एक व्हिडीओनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये मुनव्वरसोबत सेलिब्रिटी कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ.आशना कांचवाला दिसून येत आहेत. यामध्ये मुनव्वर 'दिल को तुमसे प्यार हुआ' हे गाणे गाताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर येताच लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहलं, 'हा माणूस जास्त काळ सिंगल राहू शकत नाही'. तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, 'ही तीच मुलगी आहे, जिच्यासोबत मुनव्वर भाईच्या नात्याची चर्चा होत आहे. हे दोघे जणू कुटुंब आहेत'. तर काही नेटकऱ्यांनी मुनव्वर आणि आशना फक्त मित्र असल्याचं म्हटलं आहे.

मुनव्वरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा अभिनेत्री हिना खानसोबत 'हलकी-हलकी सी' अल्बम नुकताच लाँच करण्यात आला. या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्याचे 'लिगेसी', 'ख्वाहिश' आणि 'ख्वाब' असे काही अल्बमही आहेत. मुनव्वर हा स्टँड अप कॉमेडियन आहे. तो यूट्यूबवर खूप लोकप्रिय आहे. 'बिग बॉस १७'पूर्वी तो कंगना रणौतच्या 'लॉक अप' शोमध्ये दिसला होता. या शोची ट्रॉफीही त्याने जिंकली होती.

Web Title: Munawar Faruqui Is Dating Cosmetologist, Aashna Kanchwala? Their Cosy Video Viral