मुंबई पुणे मुंबई २ खास दिवाळी भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:48 IST2016-01-16T01:14:27+5:302016-02-06T13:48:43+5:30

मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा झाल्यावर आम्ही वेगवेगळी कामे करत होतो. पण या इतर ठिकाणी जेव्हा आम्ही जायचो, तेव्हा ...

Mumbai Pune: 2 special Diwali gifts! | मुंबई पुणे मुंबई २ खास दिवाळी भेट!

मुंबई पुणे मुंबई २ खास दिवाळी भेट!

ंबई पुणे मुंबई हा सिनेमा झाल्यावर आम्ही वेगवेगळी कामे करत होतो. पण या इतर ठिकाणी जेव्हा आम्ही जायचो, तेव्हा एक प्रश्न आम्हाला हटकून विचारला जायचा की मुंबई पुणे मुंबईतल्या त्या दोघांचे पुढे काय झाले? म्हणजे सिनेमा संपला, पण गोष्ट संपली नाही असे लोकांना वाटत होते. याबाबत माझा, मुक्ताचा आणि सतीशचा अनुभव सारखाच होता. यातून कुठेतरी याचा सिक्वेल यायला पाहिजे असे डोक्यात येत गेले. पण आमचे निरीक्षण असे होते की जेवढा पहिला भाग वर्क होतो, तेवढे सि.क्वेल वर्क होत नाहीत. मग पुढे विचार आला, की आपण खरोखरच सिक्वेलला न्याय देणार असू तर तो करायला हरकत नाही. त्यानंतर सतीशने अश्‍विनी शेंडे बरोबर सिनेमा लिहायला सुरुवात केली. त्यांनी या सिनेमाचे तब्बल ३२ ड्राफ्ट लिहिले. आम्ही आता जो शूट केला, तो ३२ वा ड्राफ्ट आहे. या प्रोसेसला जवळजवळ दोन वर्षे लागली. मग आमची सतीशसोबत चर्चा झाली आणि हा सि.क्वेल करायचे नक्की झाले. या सि.क्वेलमध्ये पात्रे तीच असली तरी गोष्ट मात्र वेगळी आहे. त्यामुळे हा खर्‍या अर्थाने सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या कथेला पूरक अशी गाणी यात आहेत. या चित्रपटात आम्हाला भरपूर नातेवाईक आहेत. आमच्या या नातेवाईकांनी मला व मुक्ताला सांभाळून घेतले आहे असे मला वाटते. यात नाटकातले अनेक कलावंत आहेत. प्रशांत दामले, सुहास जोशी, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, विजय केंकरे, मंगल केंकरे असे सिनिअर कलावंत यात आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्याचे आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याचे काम आम्ही या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान केले आहे. या सगळ्यांनी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं हे प्रशांत दामले यांचे या सिनेमात असलेले गाणे सतीशच्या आधीपासूनच डोक्यात होते.
प्रशांत दामले यांचा मी चाहता आहे आणि यात त्यांनी अक्षरश: दंगा केला आहे. विजय केंकरे हे तर नाट्यसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळाले याचा मला आनंद वाटतो. सतीशने यातल्या व्यक्तिरेखांचे नाते उत्कृष्ट पद्धतीने बांधले आहे आणि त्यांच्या भावभावना उत्तमरित्या मांडल्या आहेत.
माझे इतर जे चित्रपट आहेत त्यात मी हिरो साकारत गेलो आहे; पण मुंबई पुणे मुंबई २ यात मी एक व्यक्तिरेखा रंगवली आहे. हा हिरो नाहीय, तर तो तुमच्या-आमच्यातलाच एक तरुण आहे.
लार्जर ३ँंल्ल लाईफ अशी ही भूमिका नाही; तर कुठल्याही घरात सापडेल असे ही व्यक्तिरेखा आहे. हा सिनेमा करताना आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केले आहे.
- स्वप्नील जोशी, अभिनेतामुंबई पुणे मुंबईचा पार्ट एक जेव्हा पाच वर्षांपूर्वी आला, तेव्हा मराठीत अशाप्रकारचे खास तरुणाईसाठीचे कथानक असलेले असे सिनेमे फार नव्हते. शिवाय त्यात दोनच पात्रे होती, एकाच दिवसाची गोष्ट होती, असे बरेच प्रयोग त्यावेळी केले होते. माझी व स्वप्नीलची जोडी हा सुद्धा एक प्रयोगच होता. त्यामुळे तो सिनेमा लोकांना किती आवडेल, याविषयीचा काहीच अंदाज नव्हता. पहिला भाग केल्यानंतर त्याचा सि.क्वेल करायचा वगैरे काही डोक्यातच नव्हते. पण आम्ही आता तो केला आहे.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा झाल्यावर आम्ही वेगवेगळी कामे करत होतो. पण या इतर ठिकाणी जेव्हा आम्ही जायचो, तेव्हा एक प्रश्न आम्हाला हटकून विचारला जायचा की मुंबई पुणे मुंबईतल्या त्या दोघांचे पुढे काय झाले? म्हणजे सिनेमा संपला, पण गोष्ट संपली नाही असे लोकांना वाटत होते. याबाबत माझा, मुक्ताचा आणि सतीशचा अनुभव सारखाच होता. यातून कुठेतरी याचा सि.क्वेल यायला पाहिजे असे डोक्यात येत गेले. पण आमचे निरीक्षण असे होते की जेवढा पहिला भाग वर्क होतो, तेवढे सि.क्वेल वर्क होत नाहीत. मग पुढे विचार आला, की आपण खरोखरच सिक्वेलला न्याय देणार असू तर तो करायला हरकत नाही. त्यानंतर सतीशने अश्‍विनी शेंडे बरोबर सिनेमा लिहायला सुरुवात केली. त्यांनी या सिनेमाचे तब्बल ३२ ड्राफ्ट लिहिले. आम्ही आता जो शूट केला, तो ३२ वा ड्राफ्ट आहे. या प्रोसेसला जवळजवळ दोन वर्षे लागली. मग आमची सतीशसोबत चर्चा झाली आणि हा सि.क्वेल करायचे नक्की झाले. या सि.क्वेलमध्ये पात्रे तीच असली तरी गोष्ट मात्र वेगळी आहे. त्यामुळे हा खर्‍या अर्थाने सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या कथेला पूरक अशी गाणी यात आहेत. या चित्रपटात आम्हाला भरपूर नातेवाईक आहेत. आमच्या या नातेवाईकांनी मला व मुक्ताला सांभाळून घेतले आहे असे मला वाटते. यात नाटकातले अनेक कलावंत आहेत. प्रशांत दामले, सुहास जोशी, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, विजय केंकरे, मंगल केंकरे असे सिनिअर कलावंत यात आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्याचे आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याचे काम आम्ही या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान केले आहे. या सगळ्यांनी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं हे प्रशांत दामले यांचे या सिनेमात असलेले गाणे सतीशच्या आधीपासूनच डोक्यात होते.
प्रशांत दामले यांचा मी चाहता आहे आणि यात त्यांनी अक्षरश: दंगा केला आहे. विजय केंकरे हे तर नाट्यसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळाले याचा मला आनंद वाटतो. सतीशने यातल्या व्यक्तिरेखांचे नाते उत्कृष्ट पद्धतीने बांधले आहे आणि त्यांच्या भावभावना उत्तमरित्या मांडल्या आहेत.
माझे इतर जे चित्रपट आहेत त्यात मी हिरो साकारत गेलो आहे; पण मुंबई पुणे मुंबई २ यात मी एक व्यक्तिरेखा रंगवली आहे. हा हिरो नाहीय, तर तो तुमच्या-आमच्यातलाच एक तरुण आहे.
लार्जर ३ँंल्ल लाईफ अशी ही भूमिका नाही; तर कुठल्याही घरात सापडेल असे ही व्यक्तिरेखा आहे. हा सिनेमा करताना आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केले आहे.
- स्वप्नील जोशी, अभिनेता मुंबई पुणे मुंबईचा पार्ट एक जेव्हा पाच वर्षांपूर्वी आला, तेव्हा मराठीत अशाप्रकारचे खास तरुणाईसाठीचे कथानक असलेले असे सिनेमे फार नव्हते. शिवाय त्यात दोनच पात्रे होती, एकाच दिवसाची गोष्ट होती, असे बरेच प्रयोग त्यावेळी केले होते. माझी व स्वप्नीलची जोडी हा सुद्धा एक प्रयोगच होता. त्यामुळे तो सिनेमा लोकांना किती आवडेल, याविषयीचा काहीच अंदाज नव्हता. पहिला भाग केल्यानंतर त्याचा सि.क्वेल करायचा वगैरे काही डोक्यातच नव्हते. पण आम्ही आता तो केला आहे.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री

Web Title: Mumbai Pune: 2 special Diwali gifts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.