पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 12:50 IST2024-03-17T12:49:27+5:302024-03-17T12:50:17+5:30

"दार उघड बये...दार उघड...", मुंबई इंडियन्सचा टिम डेव्हिड म्हणतो 'होम मिनिस्टर'! आदेश बांदेकरांनी केली मजेशीर कमेंट

mumbai indians welcome tim david with home minister marathi serial song aadesh bandekar commented on video | पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..."

पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..."

टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणजे 'होम मिनिस्टर'. गेल्या कित्येक वर्षांपासून हा शो अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. "दार उघड बये...दार उघड..." असं म्हणत वहिनींच्या मनात स्थान मिळवलेले आदेश भाऊजी पैठणी घेऊन घराघरात पोहोचतात. आदेश बांदेकरांच्या होम मिनिस्टरची भुरळ मुंबई इंडियन्सलाही पडली आहे. मुंबई इंडियन्सही होम मिनिस्टरची फॅन झाली आहे. 

मुंबई इंडियन्सने टिम डेव्हिडचं खास अंदाजात स्वागत केलं आहे. होम मिनिस्टरचं शीर्षक गीत वापरुन त्यांनी एक खास व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत टिम डेव्हिडचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. हातात पैठणी घेऊन डेव्हिड दार उघड बये म्हणत एन्ट्री घेताना दिसत आहे. होम मिनिस्टर शोच्या शीर्षक गीताप्रमाणेच मुंबई इंडियन्सच्या व्हिडिओतही काही महिला दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. "दार उघड बये...दार उघड...टिम भाऊजी आले आहेत", असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

टिम डेव्हिडचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सने या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. तर महाराष्ट्राच्या लाडक्या आदेश भाऊजींनाही या व्हिडिओवर कमेंट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. या व्हिडिओवर आदेश बांदेकरांनी "वाह! 'टिम' जिंकलीच पाहिजे धाकटे भाऊजी..." अशी मजेशीर कमेंट केली आहे. या कमेंटवर मुंबई इंडियन्सच्या टीमकडून रिप्लाय देण्यात आला आहे. 

दरम्यान, २० मार्चपासून यंदाच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२४ ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून जय्यत तयारी होत आहे. 

Web Title: mumbai indians welcome tim david with home minister marathi serial song aadesh bandekar commented on video