'माझ्यासोबत तो अन्य...'; अभिनेत्रीने केला सहकलाकारावर अत्याचाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 15:39 IST2023-04-30T15:37:38+5:302023-04-30T15:39:13+5:30

Actress: अभिनेत्रीच्या आरोपांनंतर संबंधित अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

mumbai actress rape case tv actress accuses coactor of rape | 'माझ्यासोबत तो अन्य...'; अभिनेत्रीने केला सहकलाकारावर अत्याचाराचा आरोप

'माझ्यासोबत तो अन्य...'; अभिनेत्रीने केला सहकलाकारावर अत्याचाराचा आरोप

मध्यंतरी कलाविश्वात #MeToo हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. कलाविश्वातील अनेक स्त्रियांनी, अभिनेत्रींनी या मोहिमेअंतर्गंत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. यामध्येच आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या सहकलाकारावर अत्याचाराचे आरोप केले आहेत. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी भाष्य केलं आहे.

छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने तिच्या सहकलाकारावर लग्नाचं खोटं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिच्या या आरोपांनंतर या अभिनेत्याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळून लावण्यात आली. परिणामी, या अभिनेत्याने आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. 

"मागील ९ महिन्यांपासून माझे माझ्या सहकलाकारासोबत रिलेशन होतं. आमच्या नात्यात सारं काही सुरळीत सुरु होतं. मात्र, तो माझ्यासोबतच अन्य कोणाला तरी डेट करत असल्याचं मला जाणवलं. याविषयी मी त्याला जाबही विचारला. परंतु, आमच्यात केवळ मैत्री आहे असं त्याने मला सांगितलं.  आमचं अफेअर सुरु असतानाच त्याच्या आजीचं निधन झालं. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या कारणांसाठी माझ्याकडून पैसेही घेतले", असं ही अभिनेत्री म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्याच्या वाढदिवशी मी त्याच्या घरी गेले. पण, तेथे आगोदरच एक मुलगी होती आणि तिने मला परत जायला सांगितलं. इतकंच काय तर तिने मला माझ्या बॉयफ्रेंडला भेटण्यापासून, त्याच्या घरी येण्यापासून अगदी त्याचा वाढदिवस साजरा करु देईपर्यंत प्रत्येक गोष्टीत रोखत होती. याचा मला खूप मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर त्या दोघांनीही मेसेज करुन माझी माफी मागितली. परंतु, मला मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी माझ्या प्रियकरासोबतच राहते. याविषयी मी त्याला विचारलं. तर, त्याने मला याविषयी कुठेही न बोलण्याचा सल्ला दिला."

दरम्यान, अभिनेत्रीने केलेल्या आरोपानंतर संबंधित अभिनेत्याच्या वकिलांनी त्याची बाजू मांडली आहे. त्यानुसार, या अभिनेत्रीने केलेले आरोप खोटे आहेत. यापूर्वी तिने दाखल केलेल्या लेखी तक्रारीमध्ये या आरोपांचा उल्लेख नव्हता. पण, ज्यावेळी अभिनेत्याने तिच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर ती त्याला ब्लॅकमेल करु लागली. अभिनेत्रीने त्याच्याविरोधात आता आणखी एक तक्रार दाखल करत बलात्काराचा आरोप केला आहे. अभिनेत्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. अभिनेता निर्दोष सिद्ध होईल आणि अभिनेत्रीवर योग्य ती कारवाई केली जाईल. 
 

Web Title: mumbai actress rape case tv actress accuses coactor of rape