"ऑफिशियली निरोप......", मुलगी झाली हो मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 10:22 IST2022-09-26T09:49:49+5:302022-09-26T10:22:36+5:30

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

Mulgi Zali Ho serial fame actor post viral | "ऑफिशियली निरोप......", मुलगी झाली हो मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

"ऑफिशियली निरोप......", मुलगी झाली हो मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेचा संवेदनशील विषय प्रेक्षकांना मनापासून भावला. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मात्र लवकरच ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. मालिकेतील कलाकरांने आपलं पात्र लवकरच एक्झिट घेणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं आहे. 

या मालिकेत  एसीपी सिद्धांत ही भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ खिरीडची पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने या मालिकेतून लवकरच आपण निरोप घेणार असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर हे सांगताना तो भावूक झाला.  

मुलगी झाली हो या मालिकेतील एसीपी सिद्धांत या भूमिकेला ऑफिशियली निरोप देतोय. ज्या पात्रांनं मला लोकांचं अपार प्रेम आणि आनंद दिला. माझ्या भूमिकेने या मालिकेतून एक्झिट घेऊन दोन महिने झाले झाले. पण जेव्हा मी याबाबतचे मेसेज, कमेंट्स आणि पोस्ट वाचतो तेव्हा मला छान वाटते. ही भूमिका नेगेटिव्ह असली तरी लोक या भूमिकेला अजूनही मिस करतायेत हे पाहून कौतुक वाटतं. 

स्टार प्रवाह आणि पॅनोरोमो एंटरटेनमेंट यांनी मला ही संधी दिली त्याबदल त्यांचे धन्यवाद. लेखक, दिग्दर्शक, डीओपी, प्रकाश दादा, स्पॉट दादा, वेशभूषा, माझे सर्व स्क्रीन कलाकार, प्रेक्षक, फॅन पेज आणि प्रोजेक्टी जोडल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद…. एसीपी सिद्धांत भोसलेचा अखरेचा  नमस्कार”, असे  सिद्धांत खिरीडने यात म्हटले आहे.

Web Title: Mulgi Zali Ho serial fame actor post viral