मुग्धा प्रथमेशला चक्क 'दादा' म्हणायची अन् तो तिला... Video शेअर करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:13 IST2023-07-03T09:03:56+5:302023-07-03T10:13:04+5:30

प्रथमेश दादा कसा झाला फक्त प्रथमेश? मुग्धाने हसत हसतच सांगितलं...

mugdha vaishampayan used to call prathamesh dada during saregamapa show | मुग्धा प्रथमेशला चक्क 'दादा' म्हणायची अन् तो तिला... Video शेअर करत केला खुलासा

मुग्धा प्रथमेशला चक्क 'दादा' म्हणायची अन् तो तिला... Video शेअर करत केला खुलासा

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील लाडके मोदक आणि मॉनिटरने आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर सोशल मीडियावरुन दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. मुग्धा (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश (Prathamesh Laghate) दोघंही अप्रतिम गायक आहेतच पण त्यांचं आपापसातलं बॉंडिंगही छान आहे. अगदी आपल्याच घरातलं लग्नकार्य असल्यासारखं सर्व खूश झाले. आता मुग्धा आणि प्रथमेश आपल्या युट्यूब चॅनलमधून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. 

कसं जुळलं, कोणी कोणाला प्रपोझ केलं, 'सारेगमप' वेळी दोघं एकमेकांना काय हाक मारायचे, लग्न कधी करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत. मुग्धा आणि प्रथमेश यांनी युट्यूब व्हिडिओमधून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. कालच प्रथमेशच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरुन दोघं समोर आले. 'सारेगमप'वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना कोणत्या नावाने काय हाक मारायचे असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. यावर मुग्धाचं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल.

होय मुग्धा म्हणाली, "मला हे सांगायला खरंतर खूप मज्जा येत आहे कारण हे खूप मजेशीर आहे मी याला 'प्रथमेश दादा' म्हणायचे". तर प्रथमेश म्हणाला, 'होय कार्तिकी सुद्धा मला प्रथमेश दादा म्हणायची. फक्त कार्तिकी नंतर प्रथमेशच म्हणायला लागली आणि मुग्धा थोडीशी उशिरा प्रथमेश म्हणायला लागली. तो मधला वेळ जो तिने घेतला तो कशासाठी हे तुम्हाला आता कळलं असेलच.' तर प्रथमेश मुग्धाला काय म्हणायचा याची तुम्हाला उत्सुकता असेलच. प्रथमेश म्हणाला, 'मी हिला मुग्धाच म्हणायचो आणि कधीकधी आम्ही सगळेच हिला माऊ म्हणून हाक मारायचो.'

प्रथमेश आणि मुग्धा या क्युट कपलने व्हिडिओतून 'सारेगमप'च्या आठवणी ताज्या केल्यात. याशिवाय दोघांनी इतरही अनेक गोष्टी शेअर केल्यात. त्यांना एकमेकांमधलं काय आवडतं आणि काय आवडत नाही हेही त्यांनी सांगितलं. प्रथमेश म्हणाला, 'मला मुग्धाचा शिस्तपूर्ण स्वभाव आवडतो. तर डाएटमध्ये तिचे चीट डे खूप असतात हे आवडत नाही असं त्याने सांगितलं'. तर मुग्धा म्हणाली, 'मला प्रथमेशचं गाणं तर आवडतंच तसंच त्याचा काळजी करणारा स्वभावही आवडतो. फक्त माझीच नाही तर माझ्या घरच्यांची, मित्रमैत्रिणींचीही तो काळजी घेतो.'

मुग्धा आणि प्रथमेश लग्न कधी करणार याची आता सर्वांनाच उत्सुकता आहे. जशी त्यांनी प्रेमाची कबुली दिली तसंच लवकरच त्यांच्या लग्नाची बातमी समोर येईल हे नक्की. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: mugdha vaishampayan used to call prathamesh dada during saregamapa show