एमटिव्ही रोडीजमध्ये निखिल चिन्नप्पाने घेतली करण कुंद्राची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 15:48 IST2017-02-21T09:12:49+5:302017-02-21T15:48:10+5:30

एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमाचा रोडीझ रायझिंग हा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे. या कार्यक्रमासाठी सध्या ऑडिशन सुरू ...

In the MTV roadies, Nikhil Chinappa took hold of Kundra's place | एमटिव्ही रोडीजमध्ये निखिल चिन्नप्पाने घेतली करण कुंद्राची जागा

एमटिव्ही रोडीजमध्ये निखिल चिन्नप्पाने घेतली करण कुंद्राची जागा

टिव्ही रोडीज या कार्यक्रमाचा रोडीझ रायझिंग हा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे. या कार्यक्रमासाठी सध्या ऑडिशन सुरू असून या ऑडिशनच्या दरम्यान झालेल्या एका वादामुळे करण कुंद्राला या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या ऑडिशनच्या दरम्यान करणने एका स्पर्धकाच्या चक्क कानाखाली वाजवली असे म्हटले जात आहे. तसेच अजून एका स्पर्धकाला त्याने धक्के मारून बाहेर काढले अशीदेखील चर्चा आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करणचा त्याच्या रागावर ताबा नसल्याचे दिसून येते आहे. रोडीज हा कार्यक्रम तरुणांचा प्रचंड आवडता आहे. या कार्यक्रमाच्या अनेक विजेत्यांना आतापर्यंत छोट्या पडद्यावर आणि बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे आपण या कार्यक्रमाचा भाग बनावे असे अनेकांना वाटत आहे. रोडीजच्या नव्या सिझनची घोषणा होताच नेहमी या कार्यक्रमाच्या ऑडिशनला प्रचंड गर्दी जमते. पण यंदाच्या ऑडिशनच्यावेळी करणने एका स्पर्धकावर हात उचलल्यामुळे आणि एकाला धक्के मारून बाहेर काढल्यामुळे करणला कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. त्याची जागा आता निखिल चिन्नपा घेणार असल्याचीदेखील चर्चा आहे. निखिल हा एक व्हीजे असून त्याने याआधीदेखील रोडीजमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे. 
कोणत्याही वादामुळे नव्हे तर रोडीज रायजिंग या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या तारखा जुळत नसल्याने करण रोडीजमधून बाहेर पडला असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तो या वर्षी रोडीजचा भाग नसल्याचे त्याने नुकतेच म्हटले आहे. यावर्षी तो काही कामांमध्ये व्यग्र असल्याने त्याने या कार्यक्रमापासून दूर राहाण्याचे ठरवले असल्याचे तो सांगतो. 

karan kundra mtv roadies


 

Web Title: In the MTV roadies, Nikhil Chinappa took hold of Kundra's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.