मालिकेचं मानधन थकवलं, त्याच दिग्दर्शकासोबत मृणालला पुन्हा करायचंय काम? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:21 IST2024-06-06T17:21:17+5:302024-06-06T17:21:50+5:30

भारतात आल्यावर मृणालला कोणाकोणासोबत काम करण्याची इच्छा आहे हे तिने सांगितलं

Mrunal Dusanis talks about she want to work with many marathi directors including Mandar Devasthali | मालिकेचं मानधन थकवलं, त्याच दिग्दर्शकासोबत मृणालला पुन्हा करायचंय काम? म्हणाली...

मालिकेचं मानधन थकवलं, त्याच दिग्दर्शकासोबत मृणालला पुन्हा करायचंय काम? म्हणाली...

मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही मराठमोळी अभिनेत्री 5 वर्षांनी पुन्हा भारतात आली आहे. सध्या ती ठाण्यात राहत असून लवकरच इंडस्ट्रीत कमबॅक करण्याच्या तयारित आहे. 2018 साली मृणालने नीरज मोरेशी लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' ही तिची शेवटची मालिका होती. शशांक केतकर आणि मृणालची जोडी सगळ्यांनाच आवडली. मात्र या मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांच्यावर कलाकारांनी पैसे थकलवल्याचे आरोप केले होते. मृणाललाही तिचे पैसेच मिळाले नव्हते. आता कमबॅक करत असताना मृणालने पुन्हा मंदार देवस्थळींबरोबर काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

भारतात आल्यावर मृणालला कोणाकोणासोबत काम करण्याची इच्छा आहे हे तिने सांगितलं. "लोकमत फिल्मी"ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "नागराज मंजुळेंसोबत काम करायचंय ते ज्या पद्धतीने भूमिका पोर्ट्रे करतात. त्यांचा rawness मला आवडतो. मला ते करायला आवडेल. त्यांना माझ्या योग्य काही वाटलं आणि मला तशी संधी मिळाली तर नक्कीच आवडेल. केदार शिंदे, रवी जाधव आहेत थोडं बोल्ड वाटेल पण मंदार देवस्थळीबरोबरही काम करायला आवडेल. मंदार दिग्दर्शक म्हणून खरंच खूप चांगला आहे.  नवीन लोकांबरोबरही काम करायचंय.  ते त्यांच्या नवीन कल्पना घेऊन येत आहेत."



मंदार देवस्थळी मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्यांनी अनेक मालिकांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. 'हे मन बावरे' मालिकेत शशांक केतकर, मृणाल दुसानिस, शर्मिष्ठा राऊत हे कलाकार होते. पैसे न मिळाल्याने त्यावेळी आधी शशांक केतकरने याविरोधात आवाज उठवला होता. नंतर शर्मिष्ठा आणि मृणालनेही मानधन मिळालं नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा मंदार देवस्थळी यांनीही हे मान्य करत त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. 

Web Title: Mrunal Dusanis talks about she want to work with many marathi directors including Mandar Devasthali