टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने 9 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:07 IST2022-07-09T17:06:54+5:302022-07-09T17:07:40+5:30

नुकतीच टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नच्या बेडीत अडकली. आपल्या बॉयफ्रेंडसोबत तिने गुपचूप लग्न केलं

Mreenal deshraj tied the knot with Ashim Mathan | टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने 9 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ

टीव्हीवरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने 9 वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ

सध्या टीव्ही इंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक अभिनेता अभिनेत्री लग्नगाठ बांधली आहे. नुकतीच टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नच्या बेडीत अडकली. आपल्या बॉयफ्रेंडसोबत तिने गुपचूप लग्न केलं. तिचा लग्नाचा फोटो समोर आला आहे.

अलीकडेच तिने प्रियकर आशिम माथन (Ashim Mathan)सोबत गुपचूप लग्न केले. त्यांचे लग्न अतिशय खाजगी पद्धतीने पार पडले, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. इतकंच नाही तर अभिनेत्री रिसेप्शन खासगी पद्धतीने करण्याचा विचार करत आहे. एका ताज्या मुलाखतीत त्याने आपल्या लग्नाविषयी सांगितले आहे.

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने लग्नगाठ बांधल्याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, माझे लग्न झाले. ही एक गुप्त बाब होती. माझं रिसेप्शन होणार आहे आणि त्याआधी मेहंदी आणि इतर विधी देखील होतील. रिसेप्शन देखील एक प्रायव्हेट पद्धतीने होणार आहे." तिने मुलाखतीत खुलासा केला होता की 9 जून 2022 रोजी त्याने आशिमशी एंगेजमेंट केली होती.

मृणाल तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आशिमसोबत लग्न केले आहे. तिचा नवरा आता 34 वर्षांचा आहे, तर अभिनेत्री 43 वर्षांची आहे. अभिनेत्रीने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
 

Web Title: Mreenal deshraj tied the knot with Ashim Mathan