सुंदरा..! लग्नानंतर आणखी खुललं मौनी रॉयचं सौंदर्य, पतीसोबत पहिल्यांदाच मीडियासमोर आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 12:12 IST2022-01-31T12:07:22+5:302022-01-31T12:12:25+5:30

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)  आणि पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) लग्नानंतर पहिल्यांदा मीडियासमोर आले.

Mouni roy looked drop dead gorgeous in first public appearance post marriage with hubby suraj nambiar | सुंदरा..! लग्नानंतर आणखी खुललं मौनी रॉयचं सौंदर्य, पतीसोबत पहिल्यांदाच मीडियासमोर आली समोर

सुंदरा..! लग्नानंतर आणखी खुललं मौनी रॉयचं सौंदर्य, पतीसोबत पहिल्यांदाच मीडियासमोर आली समोर

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)  आणि पती सूरज नांबियार  (Suraj Nambiar) रविवारी लग्नानंतर पहिल्यांदाच पब्लिक अपीयरेंस दिला. लग्नानंतर हे कपल रविवारी गोव्याहून मुंबईला परतले आणि एअरपोर्टवर पापाराझींनी त्यांना पाहिले. यावेळी दोघेही खूप खुश होते. यावेळी मौनी रॉयने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. 

बनारसी साडीत मौनी सुंदर दिसत होती. तर, सूरज नांबियारने मॅचिंग सँडल, सिल्क कुर्ता-पायजामा आणि डोळ्यावर सनग्लासेस घातले होते. दोघेही एअरपोर्टवरुन बाहेर येताच मीडियाने त्यांना घेरले.  मौनी रॉय वारंवार मीडियाचे आभार मानताना दिसली. मौनी रॉयचा न्यूली वेडिंग लूक लोकांना खूप आवडला. 

 मौनी रॉयने लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत २७ जानेवारीला गोव्यात लग्न केले. मौनी रॉयने बंगाली आणि दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यांच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि खास मित्रमंडळी उपस्थित होती. अर्जुन बिजलानी, मंदिरा बेदी, आश्का गोराडिया आणि आमना शरीफ यांनी मौनीच्या लग्नाला हजेरी लावली होती.इंस्टाग्रामवर दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. 

कोण आहे सूरज नांबियार? 
मौनीचा पती सूरज नांबियारची ओळख  बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे. सूरजने अशोक इंडिया या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे. तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे.

Web Title: Mouni roy looked drop dead gorgeous in first public appearance post marriage with hubby suraj nambiar